कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांचं शिक्षण मोफत व्हावं; सोनूची सरकाला विनंती
गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने गरजूंना विविध पद्धतीने मदत केली. तर आता पुन्हा एकदा सोनूने कोरोनाच्या संकटकाळात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सोनू सूदने सरकारला अपीलही केलं आहे. यासंदर्भात सोनूने सोशल मीडियावर एक व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये सोनू म्हणतो, “नमस्कार, मी आज सरकारला आणि मदतीसाठी पुढे येऊ इच्छित असलेल्या […]
ADVERTISEMENT
गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने गरजूंना विविध पद्धतीने मदत केली. तर आता पुन्हा एकदा सोनूने कोरोनाच्या संकटकाळात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सोनू सूदने सरकारला अपीलही केलं आहे.
ADVERTISEMENT
यासंदर्भात सोनूने सोशल मीडियावर एक व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये सोनू म्हणतो, “नमस्कार, मी आज सरकारला आणि मदतीसाठी पुढे येऊ इच्छित असलेल्या सर्वांना विनंती करतो. आपण पाहिलं असेल की, कोरोनाच्या दुसर्या लामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. काही मुलांनी त्यांचे पालक गमावले. यामध्ये जे खूप लहान आहेत, काही 9 वर्षांचे आणि काही 8-12 वर्षे वयाचे आहेत त्यांच्या भविष्याचं काय याचा मी नेहमी विचार करतो.”
पूरे देश को मिल के इस मुहिम में जुड़ना है। @EduMinOfIndia pic.twitter.com/ei9QJYtDcF
— sonu sood (@SonuSood) April 29, 2021
सोनू पुढे म्हणतो, मी सरकारला आवाहन करतो एक असा नियम असावा की, “या कोविड दरम्यान ज्या मुलांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावलंय त्यांचं शाळा ते महाविद्यालयीन असं संपूर्ण शिक्षण विनामूल्य व्हायला हवं. ती मुलं सरकारी शाळेत असतील किंवा खाजगी शाळेत त्यांना शिक्षण विनामूल्य द्यावं. जेणेकरून त्यांना त्यांचं भविष्य सुरक्षित करता येईल. विशेषत: ज्यांनी या कोविड दरम्यान आपले कुटुंबातील सदस्य गमावलेत त्यांच्यासाठी हा नियम बनला पाहिजे.”
हे वाचलं का?
We are trying our best to reach out to you. If there are delays or we miss out.
Then pardon me..Apologies? pic.twitter.com/4NvjrnZ4zP— sonu sood (@SonuSood) April 28, 2021
नुकतंच सोनूने काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला होता. बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द व्हाव्यात अशी मागणी त्याने केली होती. त्यानंतर राज्यात 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT