महाराष्ट्राच्या ‘फुलराणी’च्या मार्गात कोरोनाचा अडसर, ऑलिम्पिक स्वप्नासाठी हवेत आर्थिक पाठबळाचे पंख
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगाचं अर्थचक्र पुरतं बिघडवून ठेवलं आहे. कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. आता हळुहळु क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटनच्या स्पर्धा सर्व नियमांचं पालन करुन भरवल्या जात असताना महाराष्ट्राच्या एका उमद्या बॅडमिंटनपटूसमोर कोरोनाने मोठा पेच निर्माण केला आहे. २०२४ साली ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या नागपूरच्या मुग्धा […]
ADVERTISEMENT
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगाचं अर्थचक्र पुरतं बिघडवून ठेवलं आहे. कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. आता हळुहळु क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटनच्या स्पर्धा सर्व नियमांचं पालन करुन भरवल्या जात असताना महाराष्ट्राच्या एका उमद्या बॅडमिंटनपटूसमोर कोरोनाने मोठा पेच निर्माण केला आहे.
२०२४ साली ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या नागपूरच्या मुग्धा आग्रेला या काळाच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी न होता आल्यामुळे मुग्धाचं वर्ल्ड रँकिंग घसरलंय. ज्यावर उपाय म्हणून मुग्धा आणि तिचे पालक तिच्या स्वप्नांना आर्थिक मदतीचे पंख देण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे वाचलं का?
वयाच्या १२ व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केलेल्या मुग्धाने फार कमी वेळात आपलं नाव कमावलं. आजही मुग्धा नागपूरच्या महादूला येथील बॅडमिंटन कोर्टवर दररोज सहा तास सराव करते. BAI (Badminton Association of India) च्या क्रमवारीत मुग्धा बाराव्या क्रमांकावर असून BWF (Badminton World Federation) मध्ये तिचं रँकिंग ९७ एवढं आहे. मुग्धाचं रँकिंग घसरण्यात कोरोना आणि त्यानंतर आर्थिक समस्येने मोठा खोडा घातला आहे.
ADVERTISEMENT
काही महिन्यांपूर्वी मुग्धाचं वर्ल्ड रँकींग हे ५९ होतं. पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवालनंतर मुग्धा ही तिसरी भारतीय बॅडमिंटनपटू आहे. परंतू कोविडपश्चात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाही होण्यासाठी लागणारा खर्च मुग्धा करु शकली नाही, ज्यामुळे तिला स्पर्धांमध्ये सहभागी होता आलं नाही. परिणामी मुग्धाच्या क्रमवारीत घसरण होऊन ती ९७ व्या क्रमांकावर घसरली. आगामी २०२४ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मुग्धाचं नाव भारताकडून संभाव्य खेळाडूंच्या यादीत अग्रेसर आहे. परंतू यासाठी तिला जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. असं झालं तरच मुग्धाचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.
ADVERTISEMENT
यावर उपाय म्हणून मुग्धाने आपल्या बाजूने सोशल मीडियावर स्पॉन्सर्स मिळावेत यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मुग्धा सध्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू जी.बी.वर्गीस यांच्याकडे शिकत आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळत असलेली मुग्धा 23 वर्षाची असून तिने अनेक आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये पदक पटकावले आहेत। सुपर सिरीज, ग्रँड प्रिक्स स्पर्धां मध्ये सुद्धा ती नेहमीच सहभागी होत असते, परंतु कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे तिच्या समोर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
मुग्धाचे प्रशिक्षक वर्गिसही आपल्या बाजूने मुग्धाला सरकारी किंवा खासगी कंपन्यांकडून स्पॉन्सरशीप मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वी मुग्धाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आव्हानाला आता काही प्रमाणात प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे. परंतू आंतरराष्ट्रीय स्तरावर मुग्धाला खेळण्यासाठी आणखी मदतीची गरज लागणार आहे. मुग्धाचे वडील हे CGST विभागात कार्यरत असून मध्यवर्गीय आग्रे कुटुंबाला आपल्या मुलीला तिला अपेक्षित असलेली आर्थिक रसद पुरवणं अशक्य होऊन बसलं आहे. मुग्धाचे आर्थिक आधार असलेले काका कोरोनाच्या पहिल्या लाटेत निधन पावले, त्यामुळे तिच्यासमोरचं संकट आणखीनच गडद झालंय.
परंतू आपल्या मुलीत असलेलं कौशल्य आणि बॅडमिंटन खेळण्यासाठी असलेलं स्किल पाहून मुग्धाचे वडील नितीन आग्रे यांनीही समाजातील दानशूर व्यक्तींना पुढे येऊन मदतीचं आवाहन केलं आहे. याच मदतीवर मुग्धा आपलं सुवर्णपदकाचं स्वप्न साकारु शकणार आहे, ही मदत मिळाली तर भारताला बॅडमिंटनमध्ये एक नवीन नेतृत्व मिळेल अस आवाहन मुग्धाच्या वडीलांनी केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या फुलराणीला आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी आता सरकार आणि संबंधित यंत्रणांवर येऊन ठेपलेली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT