गंगुबाई काठियावाडी बघता येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर; 26 एप्रिलला होणार रिलीज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावर आलेला गंगुबाई काठियावाडी सिनेमा तुम्ही बघिलाय का? बघितला नसेल, तर वीकेंडला तुम्हाला घरीच हा चित्रपट बघता येणार आहे.

हो, कारण गंगुबाई काठियावाडी यांच्या भूमिकेत असलेल्या आलिया भट्टचा हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.

हे वाचलं का?

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर चित्रपटगृहात झळकलेल्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.

आलिया भट्टची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. चित्रपटगृहात आठ आठवडे पुर्ण केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

ADVERTISEMENT

गंगुबाई काठियावाडी चित्रपट २६ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

ADVERTISEMENT

नेटफ्लिक्सवर हा चित्रपट बघता येणार असून, तशी घोषणा नेटफ्लिक्सकडून करण्यात आली आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.

गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे.

पती रमणीकलालने गंगुबाईला कुंटणखान्यात विकलं होतं आणि त्यानंतर गंगुबाई वेश्याव्यवसायात ढकलली गेली.

परिस्थितीमुळे वेश्याव्यवसायात ढकल्या गेलेल्या गंगुबाई पुढे देहविक्री करणाऱ्या हजारो स्त्रियांचा आवाज बनली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT