सलमान खानच्या आगामी टायगर ३ च्या सेटचं प्रचंड नुकसान, निर्मात्यांना कोट्यावधी रूपयांचा बसला फटका
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ स्टारर ‘टायगर 3’ सिनेमाला मोठा फटका बसला आहे. चित्रपटासाठी सर्वचं टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. पण टीमची ही मेहनत व्यर्थ ठरली आहे. ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंग आधीच सेटचं मोठं नुकसान झालं आहे. ज्यामुळे निर्मात्यांना देखील मोठा तोटा झाला आहे. लॉकडाऊन पूर्वी चित्रपटाच्या शूटींगसाठी सेट उभारण्यात आला होता. पण […]
ADVERTISEMENT
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ स्टारर ‘टायगर 3’ सिनेमाला मोठा फटका बसला आहे. चित्रपटासाठी सर्वचं टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. पण टीमची ही मेहनत व्यर्थ ठरली आहे. ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंग आधीच सेटचं मोठं नुकसान झालं आहे. ज्यामुळे निर्मात्यांना देखील मोठा तोटा झाला आहे. लॉकडाऊन पूर्वी चित्रपटाच्या शूटींगसाठी सेट उभारण्यात आला होता. पण कोरोना व्हायरसचा वाढता थैमान पाहाता शूटींग बंद करण्यात आलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचं मोठं नुकसान झालं आहे.
ADVERTISEMENT
‘टायगर 3’ चित्रपटाचं सेट दुसऱ्या ठिकाणी उभारण्यात आला. दुसऱ्यांदा सेट तयार करण्यासाठी तब्बल 250-300 कामगारांची मदत लागली. पण लॉकडाऊनमुळे सेटचा उपयोग झाला नाही. मुंबईत पावसाने देखील जोर धरला आहे. त्यामुळे ‘टायगर 3’ सिनेमाचा सेट उध्वस्त झाला आहे. सिनेमात कतरीना कैफ आणि सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता इमरान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT