KGF Chapter 2 trailer : रॉकी भाईचा जलवा, संजय दत्तचाही खतरनाक अंदाज; केजीएफ-२ ट्रेलर रिलीज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही वर्षात दाक्षिणात्या सिनेमांचा दबदबा वाढला असून, बॉलिवूडवरही वरचढ ठरताना दिसत आहे. भारतातही दाक्षिणात्य सिनेमांचा चाहता वर्ग वाढत असून, अभिनेता यशची भूमिका असलेल्या केजीएफ चॅप्टर १ सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या चॅप्टरची प्रतिक्षा होती. लवकरच प्रतिक्षा संपणार असून, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

ADVERTISEMENT

संजय दत्तने साकारलाय खतरनाक व्हिलन

केजीएफ चॅप्टर २ ची प्रतिक्षा बऱ्याच दिवसांपासून होती. सिनेमांतील पात्रांचीही चर्चा होती. चॅप्टर २ मध्ये यशसोबत संजय दत्त आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यात संजय दत्तने अधीराच्या भूमिकेत आहे. संजय दत्त अधीराच्या भूमिकेत जबरदस्त दिसत आहे. संजय दत्तचा अधीराच्या भूमिकेतील लूकही लक्षवेधून घेणारा आहे.

हे वाचलं का?

संजय दत्तबरोबर चित्रपटात अभिनेत्री रविना टंडनचीही भूमिका आहे. रविना टंडनाचीही भूमिकाही महत्त्वाची असून, माहितीप्रमाणे रविनाची भूमिका इंदिरा गांधींच्या भूमिकेवरून प्रेरित आहे. अभिनेता यश पहिल्या भागाप्रमाणेच या भागातही जबरदस्त अॅक्शनमध्ये आहे.

केजीएफ चॅप्टर २ च्या ट्रेलरमध्येच यशची एका डॉयलॉगसोबत एन्ट्री आहे. एन्ट्री करताना रॉकीभाई (यश) म्हणतो की, मला हिंसा आवडत नाही. मी हिंसा टाळतो, पण हिंसेला मी आवडतो आणि त्यामुळे मी टाळू शकत नाही (आय डोन्ट लाईक व्हायलन्स, आय अव्हॉईड व्हायलन्स, बट व्हायलन्स लाईक्स मी. आय कान्ट अव्हॉईड.) या चित्रपटात प्रकाश राज यांचीही भूमिका आहे.

ADVERTISEMENT

कधी होणार रिलीज?

ADVERTISEMENT

केजीएफ चॅप्टर १ हा २०१८ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. सिनेमाने जगभरात २३५ कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता. भारतात चित्रपट हिट झाला. त्यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा सुरू होती. केजीएफ चॅप्टर २ आता १४ एप्रिल २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT