Park Soo Ryun: पायऱ्यांवरून पडून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, पण तिचं हृदय कायम..
Snowdrop: एका कोरियन अभिनेत्रीचा पायऱ्यांवरुन पडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी काय निर्णय घेतला.
ADVERTISEMENT
कोरियन अभिनेत्री पार्क सू रयून (Park Soo Ryun) हिचे आकस्मिक निधन झाले आहे. ती अवघ्या 29 वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी पार्क ही घरी जात असताना अचानक पायऱ्यांवरून खाली पडली होती. ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, यामध्ये ते अपयशी ठरले. यावेळी डॉक्टरांनी अभिनेत्रीला ब्रेन डेड (Brain Dead) घोषित केलं. अभिनेत्री पार्क हिचा ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी खरं तर तिला जेजू बेटावर परफॉर्म करायचा होतं. पार्क सू रयून हिच्या निधनामुळे कोरियन मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिच्या अशा जाण्याने प्रचंड दु:ख झालं आहे. (korean actress park soo ryun passes away at age of 29 falling from stairs)
ADVERTISEMENT
अभिनेत्रीचे आई-वडील करणार तिचे अवयव दान
अभिनेत्री पार्क सू रयूनच्या कुटुंबाने तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. Soompi च्या रिपोर्टनुसार, पार्कच्या निधनानंतर तिची आई म्हणाली, ‘फक्त तिच्या मेंदूचा मृत्यू झाला आहे. पण तिचे हृदय अजूनही धडधडत आहे. जगात कोणीतरी असावं ज्याला या अवयवांची नितांत गरज आहे. तिचे आई-वडील या नात्याने आम्हाला या गोष्टीचा अधिक आनंद होईल की, तिचे हृदय दुसर्या कोणाकडे तरी आहे आणि आजही धडधडत आहे.
हे वाचलं का?
कोण होती पार्क सू रयून ?
2018 मध्ये, अभिनेत्री पार्क सू रयूनने Il Tenore मधून पदार्पण केले होते. यानंतर ती फाईंडिंग मिस्टर डेस्टिनी, द डेज वी लव्हड, तसेच ती इतर म्युझिकल अलब्ममध्ये देखील दिसली होती. तिने सुप्रसिद्ध कोरियन शो ‘स्नोड्रॉप’मध्ये देखील काम केले. या शोमुळे तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळाली.
Musical Actress #ParkSooRyun Passes Awayhttps://t.co/D7BrJPKMHg pic.twitter.com/ZTW77WrF7N
— Soompi (@soompi) June 12, 2023
ADVERTISEMENT
‘स्नोड्रॉप’मधील तिच्या भूमिकेविषयी ती काही दिवसांपूर्वीच बोलली होती. तिने सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले होते. तिने सांगितले होते की, शोमध्ये तिची भूमिका खूपच छोटी असली तरीही सेटवर तिची पुरेपूर काळजी घेतली जात होती. यासोबत तिने अभिनेता जंग हेसोबत (Jung Hae) पुन्हा काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT
पार्क सू रयूनचा मृतदेह ग्योन्गी प्रांतीय वैद्यकीय केंद्राच्या (Gyeonggi Provincial Medical Center) सुवोन रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आज (13 जून रोजी) तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी तिचे कुटुंबीय आणि जवळचे लोक या गुणी अभिनेत्रीला अखेरचा निरोप देतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT