लाल सिंह चड्ढाच्या रिलीजपर्यंत आमिर उचलणार मोठं पाऊल
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाल सिंह चड्ढा डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी आमिर खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. नेहमी काहीतरी नवीन हटके निर्णय घेणाऱ्या आमिर खानने यावेळी मोबाईल फोन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. लाल सिंह चड्ढा हा त्याचा सिनेमा रिलीज होईपर्यंत […]
ADVERTISEMENT
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाल सिंह चड्ढा डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी आमिर खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. नेहमी काहीतरी नवीन हटके निर्णय घेणाऱ्या आमिर खानने यावेळी मोबाईल फोन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
लाल सिंह चड्ढा हा त्याचा सिनेमा रिलीज होईपर्यंत आमिरने मोबाईल न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात आमिर त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो. आमिरचा मोबाईल फोन त्याच्या कामात सतत अडथळा बनत असल्याचं त्याला जाणवलं. आमिर खान नेहमी त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टवर लक्ष देऊन काम करतो. यामुळे त्याच्या या सिनेमाच्या दरम्यान फोनचा व्यत्यय येऊ नये असं आमिरला वाटतंय. यासाठी त्याने हे मोठं पाऊल उचललं आहे.
आमिर खानचे चाहते त्याच्या लाल सिंह चड्ढा या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहतायत. नेहमीप्रमाणे यंदाही आमिरचा हा सिनेमा ख्रिसमच्या काळात रिलीज करण्यात येणार असल्याची चर्चा रंगलीये. लाल सिंह चड्ढा या सिनेमामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तर आमिरसोबत अभिनेत्री करिना कपूर झळकणार आहे. यापूर्वी आमिर आणि करिनाने 3 इडियट्स या चित्रपटात एकत्र काम केलंय.
हे वाचलं का?
नेहमीप्रमाणे आमिरचा हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं म्हटलं जातंय. आमिर खानचे पीके, दंगल, गजनी, तारे जमीन पर हे सिनेमे खूप हीट ठरले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT