अभिनेत्री मलायका अरोरा कार अपघातात जखमी; रुग्णालयात करण्यात आलं दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर चार वाहनांच्या विचित्र अपघातात मलायका अरोराच्या गाडीचांही समावेश असून, यात मलायका जखमी झाली आहे. घटनेनंतर मलायका अरोराला मुंबईतील रुग्णालयात भरती करण्यात आलं.

ADVERTISEMENT

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळ अपघात झाला.या अपघात मलायका जखमी झाली असून, तिला उपचारासाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

मनसेचा आज मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त मेळावा असल्याने पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी होती. दरम्यान, मुंबई-पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक झाल्याने अचानक ब्रेक लावल्याने तीन ते चार गाड्या एकावर एक आदळल्या.

ADVERTISEMENT

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या गाडीची धडक एका स्विफ्ट गाडीला बसली. यात मलायका अरोरा ही जखमी झाली. मलायका बरोबर तिच्या गाडीत ड्रायव्हर आणि तिचा बॉडीगार्ड होता. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मलायका अरोराला जखमी अवस्थेत अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ADVERTISEMENT

या अपघातात ह्युदांई कार, रेंज रोव्हर, एक मनसे कार्यकर्त्यांची मुबंईकडे जाणारी बस ही वाहने अपघातग्रस्त झाली आहेत.

मलायका अरोराच्या एका जवळच्या मित्राने ‘इंडिया टुडे’ला घटनेबद्दल माहिती दिली. मलायका अरोरा या अपघातात गंभीर जखमी झाली असून, तिला चार टाके पडले आहेत. सध्या तिची प्रकृती व्यवस्थित आहे. मलायकाच्या डोक्यात गंभीर जखम झालेली नाही, कारण मलायकाने डोक्याजवळ कुशन ठेवलेलं होतं. रविवारी दुपारपर्यंत मलायका घरी सोडले जाईल, अशी माहिती मित्राने दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT