‘या’ मराठी कलाकारांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. अशातच राज्य सरकराने लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मराठी अभिनेता भरत जाधवने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यावेळी त्याने डॉक्टर तसंच त्यांच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानलेत. मराठी सिनेमा आणि मालिका दिग्दर्शक केदार शिंदे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. अशातच राज्य सरकराने लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
हे वाचलं का?
आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मराठी अभिनेता भरत जाधवने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यावेळी त्याने डॉक्टर तसंच त्यांच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानलेत.
ADVERTISEMENT
मराठी सिनेमा आणि मालिका दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतीच कोरोनाची लस घेतली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत ‘उपक्रम पूर्ण’ असं कॅप्शनही त्यांनी दिलंय.
ADVERTISEMENT
अभिनेते आदेश बांदेकर यांनाही कोरोना प्रतिबंधक लस घेतलीये. लसीकरणानंतर त्यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केलाय.
बिग बॉस फेम आणि मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस हिने देखील कोरोना लस घेतलीये. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लसीचा पहिला डोस घेतला असं कॅप्शनही दिलंय.
काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावेनेही पत्नी मंजिरीसह कोरोना लसीचा डोस घेतला होता. ‘लस घेतली तरीही काळजी घ्यावी’ असं सुबोधने लस घेतल्यावर म्हटलं होतं.
भाऊ कदम यानेही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT