नोरा फतेहीने जॅकलिनच्या विरोधात दाखल केला खटला; न्यायालयात जाण्याचं नेमकं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री समोरासमोर आल्या आहेत. नोरा फतेहीने दिल्ली कोर्टात जॅकलिन फर्नांडिस आणि अनेक मीडिया कंपन्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. गँगस्टर सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे नाव जबरदस्तीने वापरण्यात आल्याचा आरोप नोरा फतेहीने केला आहे.

ADVERTISEMENT

सुकेशशी तिचा थेट संपर्क नव्हता, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल हिच्यामार्फत ती सुकेशला ओळखत होती. नोराने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून भेटवस्तू घेण्यास नकार दिला. मीडिया ट्रायलमुळे तिची प्रतिष्ठा दुखावली गेल्याचे नोरा म्हणते.

ठग सुकेशकडून नोराने महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या?

जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोघी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने दोन्ही अभिनेत्रींची अनेकदा चौकशी केली आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचाही आरोप नोरा फतेहीवर आहे. मात्र, नोराने प्रत्येक वेळी चौकशीदरम्यान हे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहेत. सुकेशने नोरा फतेहीचा नातेवाईक बॉबीला ६५ लाखांची बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केल्याचे सांगण्यात आले. सुकेशने निश्चितपणे बीएमडब्ल्यू कारची ऑफर दिल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र अभिनेत्रीने ही कार घेण्यास नकार दिला होता. नोराला सुरुवातीपासूनच या डीलबद्दल संशय होता. सुकेश सतत नोराला फोन करत होता. त्यानंतर नोराने सुकेशचा नंबर ब्लॉक केला, असं तिनं सांगितलं.

हे वाचलं का?

नोराची सुकेशशी भेट कशी झाली?

एका कार्यक्रमात सुकेशची पत्नी लीना हिला भेटल्याचे नोराने तपासात ईडीला सांगितले होते. लीना नोराला गुच्ची बॅग आणि आयफोन देते. लीनाने नोराला सांगितले की तिचा पती सुकेश या अभिनेत्रीचा चाहता आहे. लीनाने सुकेश आणि नोराला फोनवर बोलायला लावले. जिथे सुकेश नोराचा चाहता असल्याबद्दल बोलला. त्यानंतर लीनाने सांगितले की सुकेश नोराला टोकन म्हणून BMW देणार आहे. नोराला नंतर बीएमडब्ल्यू कारबाबत फोन आला.

नोराला बीएमडब्ल्यू कारची ऑफर

त्या गाडीच्या डीलसाठी शेखर नावाच्या व्यक्तीचा फोन आला. नोराने तिचा नातेवाईक बॉबीसोबत व्यवहार करण्याबाबत बोलले. बॉबीला शेखरला बीएमडब्ल्यूसाठी नकार देण्यास सांगितले. बॉबी पुन्हा शेखरला सांगतो की नोराला कार नको आहे. त्यानंतर शेखरने बॉबीला बीएमडब्ल्यू ऑफर केली. नंतर बॉबीच्या नावावर नोंदणीकृत दुसर्‍या डील अंतर्गत बीएमडब्ल्यू घेण्यात आली, असं सांगण्यात आलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT