काश्मीरी कलाकारांच्या सहभागातून “अमन का आशियाँ” या खास गाण्याची निर्मिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पायाभूत सेवा, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांचा पुनीत बालन स्टुडिओज आणि भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स यांनी “अमन का आशियाँ” या खास गाण्याची निर्मिती केली आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने हे गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, विशेष म्हणजे काश्मीर खोऱ्यातील युवा कलाकारांचा या गीत निर्मितीमध्ये सहभाग आहे.पुनीत बालन यांचं भारतीय लष्कराशी काश्मीर खोऱ्यातील नातं २०२० मध्ये निर्माण झालं. पुनीत बालन यांनी उरी, वायने, हाजीनार, त्रेहगाम आणि बारामुल्ला येथील आर्मी गुडविल स्कूलसाठी आर्थिक मदत करण्यासाठी आणि दरवर्षी नवी शाळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याशिवाय करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी भारतीय लष्कराला ३० हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सामाजिक मदत म्हणून भेट दिले. पुनीत बालन यांना त्यांच्या काश्मीर भेटींदरम्यान तेथील स्थानिकांशी झालेल्या संवादातून काश्मीरमध्ये संगीताविषयी असलेलं अपार प्रेम आणि तेथील गुणवान कलाकारांना संधी मिळत नसल्याचं जाणवलं. त्यातूनच काश्मीरी कलाकार आणि अन्य कलाकारांच्या सहभागातून गाण्याची निर्मिती करण्याची कल्पना पुढे आली.पुनीत बालन म्हणाले, “काश्मीर खोऱ्यातील आतापर्यंत अलक्षित कलावंतांना पुढे आणताना मला अतिशय आनंद होत आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या प्रकल्पासाठी सहकार्य केले, त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.”चिनार कॉर्प्सचे कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल देवेंद्र प्रताप पांडे यांनी पुनीत बालन स्टुडिओजला या गाण्याच्या निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘काश्मीरी तरुणांपर्यंत पोहोचून, त्यांना मदत करून, त्यांच्या कलेला मोठ्या स्तरावर नेण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं हे मोलाचं काम आहे. “अमन का आशियाँ” या गाण्यातील आशेची संकल्पना आमच्या हृदयाच्या जवळची आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT