Rahat Fateh Ali Khan : केस ओढले, चपलेने बदडलं…, प्रसिद्ध गायकाच्या ‘त्या’ व्हिडिओने संगीत विश्वात खळबळ
व्हिडिओच्या सुरुवातीला राहत यांनी नोकराचे केस पकडून ठेवले आहेत आणि नंतर हातातल्या चप्पलने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
ADVERTISEMENT
Rahat Fateh Ali Khan Viral Video : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) त्यांच्या नोकराला चपलेने मारहाण करताना दिसत आहे. टेबलावर ठेवलेली दारूची बॉटल कुठे गेली? असे नोकराला विचारत त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीका होत आहे. अखेर या सर्व प्रकरणावर राहत फतेह अली खान यांनी एक व्हिडिओ जारी करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (rahat fateh ali khan beating house helper for alcohol with chappal pakistani singer viral video)
ADVERTISEMENT
राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राहत फतेह अली खान आपल्या नोकराला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे. खरं तर व्हिडिओच्या सुरुवातीला राहत यांनी नोकराचे केस पकडून ठेवले आहेत आणि नंतर हातातल्या चप्पलने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हे ही वाचा :Maratha Reservation : जरांगे-पाटलांची पहिली मोठी घोषणा, ‘नोंदींच्या आधारे एक तरी…’
राहत यांच्या या कृतीला घाबरून नोकर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ते पुन्हा त्याच्याजवळ जातात आणि मग दारूची बाटली कुठे गेली असे विचारतात. आणि पुन्हा राहत फतेह अली खान त्याचे केस पकडतो आणि त्याला मारायला सुरूवात करतो. यावेळी मारहाण करताना ते खाली पडतात. शेजारी उभे असलेले इतर लोक त्याला उचलून घेतात, पण ते नोकराला मारहाण करणे थांबवत नाहीत. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राहत फतेह अली खानवर टीका होत आहे.
हे वाचलं का?
व्हायरल व्हिडिओवर गायक काय म्हणाला?
दरम्यान या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राहत फतेह अली खान यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते त्यांच्या नोकरासोबत उभे असून नोकराची माफी मागताना दिसत आहे. तुम्ही पाहिलेला व्हिडिओ, हे गुरु आणि शिष्य यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल आहे. माझ्या पाठीशी उभा आहे हा माझा शिष्य. गुरु आणि शिष्य यांचे नाते असे आहे की जेव्हा शिष्य चांगले काम करतो तेव्हा त्याच्यावर प्रेम केले जाते आणि जेव्हा त्याने चूक केली तेव्हा त्याला फटकारले जाते.
हे ही वाचा : Nitish Kumlar : कधी RJD, कधी BJP! नितीश कुमारांच्या ‘आयाराम गयाराम’चा हा आहे इतिहास
व्हिडिओत नोकर देखील आपली बाजू मांडताना दिसतोय. तो म्हणतो, व्हिडिओमध्ये ज्या बाटलीबद्दल बोलले जात आहे, त्या बाटलीत होली वॉटर (पवित्र पाणी) आहे. मी ते कुठे ठेवले होते ते विसरलो होतो. आणि माझे ते गुरु आहे, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. व्हिडिओ पाहून लोक जसे समजत आहेत, तसेच काहीच घडले नसल्याचे नोकर सांगत आहे.
ADVERTISEMENT
आमच्या उस्तादजींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते आमच्यावर खूप प्रेम करतात. मी बराच काळ त्यांच्यासोबत आहे. यानंतर राहत फतेह अली खान म्हणतात की, मी त्यांची माफीही मागितली आहे. पण नोकर म्हणतो नाही, ते आमच्यापेक्षा मोठे आहेत, आमचे त्यांच्यावर प्रेम आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचा एक गट राहत फतेह अली खान यांचे समर्थन करत आहे, तर एक गट त्यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT