आलिया भट्टसोबत लग्न कधी करणार?; रणबीर कपूर म्हणाला, ‘मला पिसाळलेलं कुत्रं चावलंय का?’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यातील रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होत असते. सध्या दोघांच्या लग्नाची चर्चा असून, काही दिवसांपूर्वी सब्यासाची सोबत आलिया भट्टचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. दोघंही कधी लगीनगाठ बांधणार आहे, अशी उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. लग्नाच्या तारखेबद्दल बोलताना मात्र, रणबीर कपूरने वेगळंच उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. २०१८ मध्ये दोघांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाचं शुटिंग केल्यानंतर दोघांमधील रिलेशनशिपची बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, अलिकडेच दोघांनीही चित्रपटाचं शुटिंग संपवलं. वाराणसीमध्ये चित्रपटाचं शुटिंग संपलं.

हे वाचलं का?

ब्रह्मास्र निमित्ताने आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांच पडद्यावर सोबत दिसणार आहे. त्यामुळे रणबीर-आलियाच्या चाहत्यामध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. त्यातच अलिकडेच आलियाचा सब्याची सोबतचा फोटो समोर आल्यानं लग्नाच्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने त्याच्या लग्नाच्या प्रश्नावर उत्तर दिलं होतं. आलिया आणि मी लग्न करण्याच्या विचारात आहोत आणि दोघंही लवकरच लग्न करू, असं रणबीर म्हणाला होता. लग्नाच्या तारखेबद्दल बोलताना रणबीर म्हणाला की, “लग्नाची तारीख माध्यमांना सांगायला मला काही पिसाळलेला कुत्रा चावला नाही, पण इतकं जरुर सांगेन की, मी आणि आलिया लग्न करण्याचं नियोजन करत आहोत. आशा आहे की लवकरच होईल”, असं रणबीर कपूरने सांगितलं.

ADVERTISEMENT

रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल अशी माहिती समोर आली होती की, दोघेही एप्रिलच्या दोन तारखेला एका खास सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहेत. लग्नात दोघांचे कुटुंबिय आणि काही जवळचे नातेवाईक सहभागी होणार असल्याचं काही रिपोर्टस् मध्ये म्हटलेलं होतं. सध्या तरी याबद्दल कपूर कुटुंबियांनी पूर्णपणे मौन बाळगलेलं आहे.

आलिया-रणबीरच्या लग्नाबद्दल रीमा जैन (अभिनेता ऋषी कपूर यांची बहीण) यांनीही फार बोलणं टाळलं होतं. काही दिवसांपूर्वी त्या म्हणाल्या होत्या की, “दोघंही लग्न करणार आहेत, मात्र कधी करणार आहेत. आम्हाला काही माहिती नाही. ते दोघं ठरवतील, तेव्हा सगळ्यांना कळेलच. आम्ही काहीही तयारी केलेली नाही, त्यामुळे लग्न इतक्या लवकर कसं होईल,” असं त्या म्हणाल्या होत्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT