हाताला दुखापत होऊनही सिध्दार्थ जाधवला खेळायचं आहे क्रिक्रेट
महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला सध्या दुखापत झाली असून त्याला चार टाके पडले आहेत. आता तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल, की सिद्धार्थला ही दुखापत कशी झाली? अनेक तर्कवितर्क तुम्ही लावले असतील. परंतु सिद्धार्थला ही दुखापत क्रिकेटच्या सरावादरम्यान झाली आहे. सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे वाहात आहेत. त्यातच […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला सध्या दुखापत झाली असून त्याला चार टाके पडले आहेत. आता तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल, की सिद्धार्थला ही दुखापत कशी झाली? अनेक तर्कवितर्क तुम्ही लावले असतील. परंतु सिद्धार्थला ही दुखापत क्रिकेटच्या सरावादरम्यान झाली आहे.
ADVERTISEMENT
सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे वाहात आहेत. त्यातच आता मराठी इंडस्ट्रीची क्रिकेट टूर्नामेंटही लवकरच सुरु होणार आहे. त्यातील एका संघाचा कर्णधार सिद्धार्थ असून त्यासाठीचीच सराव मॅच सुरु असताना सिद्धार्थला ही दुखापत झाली. त्याच्यावर त्वरित उपचारही करण्यात आले. मात्र उपचार करून शांत बसेल तर तो सिद्धार्थ कसला? उपचार झाल्यावर आराम न करता सरळ हातात बॅट पकडून पूर्वीच्याच एनर्जीने त्यानं सरावाला सुरुवातही केली. यातूनच तो अभिनयासोबतच क्रिकेटच्या बाबतीतही किती पॅशनेट आहे, हे कळतंय. मुळात सिद्धार्थ हा क्रिकेटप्रेमी आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्याने वेळोवेळी आपले हे क्रिकेटप्रेम सोशल मीडियावरून व्यक्तही केले आहे. त्याने पहिल्यांदा स्टेडियममध्ये पाहिलेल्या सचिनच्या मॅचचा अनुभवही चाहत्यांसोबत शेअर केला होता. क्रिकेट खेळण्याची एकही संधी सिद्धार्थ सोडत नाही. क्रिकेट की आराम असा पर्याय दिल्यावर क्रिकेटला प्राधान्य देणाऱ्या आपल्या सिद्धार्थचा हात या टूर्नामेंटमध्येही जबरदस्त चौकार आणि षटकार मारण्यासाठी लवकर बरा होऊ दे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT