शेवंताचं पुनरागमन चुकविणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रात्रीस खेळ चाले या मालिकेने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवून अगदी पहिल्या पर्वा पासूनच लोकप्रियतेचे शिखर गाठले. लॅाकडाऊनमुळं शूट बंद असल्यानं ‘रात्रीस खेळ चाले ३’ हि लोकप्रिय मालिका प्रसारित होत नव्हती पण लवकरच शूट सुरू होऊन या महिन्यात हि मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार असे संकेत मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी दिले होते. प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण १६ ऑगस्ट पासून रात्री ११ वाजता पुन्हा एकदा हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ADVERTISEMENT

या मालिकेतील सर्व कलाकार प्रेक्षकांचे अत्यंत आवडते आहेत आणि त्यातील एक व्यक्तिरेखा जिची मालिकेत प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे शेवंता. नुकतंच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि त्यात सगळ्यांच्या काळजाचा ठाव घेणारी शेवंता प्रेक्षकांना दिसली. पण यावेळी तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल कायमचा अशी चेतावणी देणारा प्रोमोची चर्चा आता सर्वत्र होतेय. प्रोमोमध्ये तिच्या अदा आणि त्याचवेळी तिचं चित्तथरारक रूप पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. त्यामुळे प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहेत १६ ऑगस्टची.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT