रूग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करून देण्यासाठी सुश्मिता सेनचा पुढाकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. अशा चिंताजनक परिस्थितीत काही बेड्स, ऑक्सिजन तसंच औषधांचा तुटवडा असल्याचं चित्रंही दिसतंय. रूग्णांना तुटवडा भासू नये यासाठी प्रत्येकजण आपपल्या परीने प्रयत्न करतंय. तर आता कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी अभिनेत्री सुश्मिता सेनने देखील पुढाकार घेतला आहे.

कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी सुश्मिता सेनने ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करून दिले आहेत. सुश्मिताने केलेल्या या मदतीचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दिल्लीमध्ये ऑक्सिजनच्या समस्येबाबत सुश्मिताला ट्विटरच्या माध्यमातून समजलं. हे कळताच सुश्मिताने काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करुनही दिले आहेत. दरम्यान यासंदर्भात सुश्मिताने मदतीसाठी ट्विट केलं. आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “हे खरंच काळीज पिळवटून टाकणारं आहे. ऑक्सिजनची समस्या सगळीकडे भासतेय. मी काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध केलेत. परंतु त्यांना मुंबईतून दिल्लीत पोहचवण्याची काहीही व्यवस्था नाही. काही मार्ग असेल तर सांगा”.

सुश्मिताने काही वेळानंतर पुन्हा एक ट्विट केलं. ती म्हणते, “मी सांगत होते त्या दवाखान्यात सध्यातरी ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. यामुळे आम्हाला सिलेंडर्स पोचवायला अधिक वेळ मिळाला आहे. सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार”.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT