Ashi Hi Banwa Banwi: तेव्हापासून धनंजय माने इथेच राहतात, ३३ वर्ष झाल्याबद्दल स्वप्निल जोशी,आश्विनी भावेंची खास पोस्ट

३३ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने अभिनेता स्वप्निल जोशी आणि आश्विनी भावेंनी सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Ashi Hi Banwa Banwi: तेव्हापासून धनंजय माने इथेच राहतात, ३३ वर्ष झाल्याबद्दल स्वप्निल जोशी,आश्विनी भावेंची खास पोस्ट

सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेला अशी ही बनवाबनवी या सिनेमाला आज रिलीज होऊन ३३ वर्ष पूर्ण झाली.. मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. आज एवढय़ा वर्षांनंतरही मराठी प्रेक्षकांची प्रचंड पसंती या चित्रपटाला मिळते आहे. प्रेक्षकांसोबतच सेलिब्रेटींचाही अत्यंत आवडता सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवीच. ३३ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने अभिनेता स्वप्निल जोशीने तेव्हापासून धनंजय माने इथेच राहतात अशी पोस्ट केली आहे.. तसेच या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्री आश्विनी भावेंनी सिनेमात त्यांच्यावर आणि अशोक सराफांवर चित्रीत झालेला सीन पोस्ट करत सिनेमाच्या आठवणी जागवल्या आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीने आपल्या सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल लिहीताना म्हटलं आहे की ..

माझ्यासाठी, सर्वोत्तम मराठी सिनेमांपैकी एक ! आज release होऊन 33 वर्ष झाली ना!!? वाटतच नाही ! कधीही पहा, कुठूनही पहा, कितीही वेळा पहा, निखळ मनोरंजन, केवळ अद्भुत कलाकृती !!!

Btw, तेव्हा पासून धनंजय माने सदैव इथेच (आमच्या हृदयात) राहतात !!

सचिनजी, अशोकमामा, लक्ष्यामामा, सुप्रियाताई, निवेदिताताई, प्रियाताई, अश्विनीजी, अरुणजी, वसंतजी, किरण शांतारामजी, सुशांतजी, सुधीरकाका व संपूर्ण टीमला सलाम !!!

तर अशी ही बनवाबनवी सिनेमात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या आश्विनी भावेंनी सोशल मिडियावर पोस्ट लिहीताना म्हटले आहे की..

33 वर्ष अजरामर धमाल कॉमेडीची! 'बनवा बनवी' वर आजही भरभरून प्रेम करणाऱ्या तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार!

अश्याप्रकारे आज सामान्य प्रेक्षक आणि सेलिब्रेटींनी आपल्या आवडत्या सिनेमाविषयी सोशल मिडीयावर भरभरून शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

Related Stories

No stories found.