कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत आली मोठी अपडेट; राजू यांचे हात पाय...

राजू श्रीवास्तव यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी त्यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.
File photo
File photo

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहते सतत प्रार्थना करत असतात. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आता त्यांच्या तब्येतीच्याबाबतीत सकारत्मक बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी त्यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना अजित सक्सेना म्हणाले, राजू यांचे हातपाय हलू लागले आहेत. ते डोळे उघडतात आणि त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तवकडे पाहतात. पत्नीच्या हाताला स्पर्श करत सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की, मी लवकर बरा होईल, असं अजित सक्सेना म्हणाले.

तब्येतीत झपाट्याने सुधारणा होतीय

माजी खासदार विनय कटियार यांनीही त्यांच्याकडून राजूची संपूर्ण माहिती घेतल्याचे अजित सक्सेना यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, राजूंच्या तब्येतीत वेगाने वेगाने सुधारणा होत आहे. राजूला रुग्णालयात दाखल करून 27 दिवस झाले आहेत. आता असे दिसते आहे की ते लवकरच बरे होतील आणि पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा आपल्यामध्ये वावरलायला लागतील, असा विश्वास अजित सक्सेना यांनी बोलून दाखवला.

फक्त पत्नीला राजूला भेटण्याची परवानगी

अजित सक्सेना म्हणतात की, राजू श्रीवास्तव यांना 27 दिवस झाले आहेत. संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून फक्त त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या येऊन सांगतात की राजूजी तिच्या हाताला स्पर्श करतात, डोळे उघडतात आणि पाहतात. हातपाय हलवून ते लवकर बरे होतील हे सांगण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत राजू लवकरच आपल्यात असतील, असे आम्हा सर्वांना वाटते, कारण राजूची प्रकृती हळूहळू सुधारत आहे, असं अजित म्हणाले.

27 दिवसांपासून आहेत रुग्णालयात

राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून एम्समध्ये दाखल आहेत. ते हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि त्यानंतर ते खाली पडले. राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली आहेत. आता हळूहळू राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in