Bigg Boss Marathi 3 : ही दोस्ती तुटायची नाही!विशाल कॅप्टन बनावा म्हणून विकासने केला मोठा त्याग

बिग बॉस मराठी ३ च्या घरामध्ये आपल्या मित्राला कॅप्टन करण्यासाठी घरातील सदस्यांना काही गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. तसा आदेश बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना दिला आहे.
Bigg Boss Marathi 3 : ही दोस्ती तुटायची नाही!विशाल कॅप्टन बनावा म्हणून विकासने केला मोठा त्याग
Bigg Boss Marathi 3... बिग बॉस मराठी ३

बिग बॉस मराठी ३ कार्यक्रम सुरू होऊन आता पन्नास दिवस उलटले आहेत. बिग बॉसच्या घरात स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, घराचा कॅप्टन होण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाने जीवाचा आटापिटा केला होता. कॅप्टनशिपच्या टास्कमध्ये प्रतिस्पर्धाला नामोहरम करण्याचा हरएकप्रकारे प्रयत्न केला. कॅप्टन होण्याच्या या ईर्ष्येमुळे अनेकदा टास्क रद्द झाला होता.

आता ही घराचा कॅप्टन होण्याच्या स्पर्धेमध्ये विशाल आणि जय यांची निवड झाली आहे. मात्र विशालला कँप्टन करण्यासाठी विकासने एक मोठा निर्णय घेतला.. त्याचा हा निर्णय ऐकून घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉस मराठी ३ च्या घरामध्ये आपल्या मित्राला कॅप्टन करण्यासाठी घरातील सदस्यांना काही गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. तसा आदेश बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना दिला आहे.

त्याप्रमाणे विकास पाटीलला आपले केस गमवावे लागतील असा आदेश बिग बॉसकडून आला, विकास पाटीलने बिग बॉस यांना सांगितले की, विशाल निकम कॅप्टन बनावा यासाठी मी ही गोष्ट करायला तयार आहे. विकासने हे सांगितल्यानंतर विशालने विकासचे केस कापायला सुरुवात केली. इतकेच नाही तर विकासचे केस कापत असताना विशाल स्वतःचेही केस कापताना दिसत आहे. विशाल आणि विकास या दोघांनी जो निर्णय घेतला ते पाहून घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. या दोघांची ही कृती पाहून मीनलला तर रडू आवरता आले नाही. तर सोनाली आणि स्नेहा यांना हे पाहून मोठा धक्का बसला.

तर दुसरीकडे जय कँप्टन व्हावा म्हणून दादूसनेही आपल्या केसाचं बलिदान केलं. दादूसला केस कापताना पाहून जयला रडू आवरता येत नव्हतं. घरातल्या सगळ्या सदस्यांना वाईट वाटत होतं. मात्र विशालसाठी विकासने केस कापलेले पाहून विशालनेही आपले संपूर्ण केस कापून टक्कल केलं याचंचं कौतुक घराबाहेर होत आहे. आता जय आणि विशाल यांना समसमान मतं असून स्नेहा आता या दोघांपैकी कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकते. आणि घराचा कँप्टन विशाल होतो की जय हे आजच्या भागात कळेल. पण बिग बॉसमध्ये ही दोस्ती तुटायची नाही हे विशाल आणि विकासने पुन्हा एकदा सिध्द केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in