Aryan Khan Bail: गौरी खान गाडीत बसून रडत असलेल्या व्हायरल व्हिडिओमागचं हे आहे सत्य...

Aryan Khan Bail: गौरी खान गाडीत बसून रडत असलेल्या व्हायरल व्हिडिओमागचं हे आहे सत्य...

गौरी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवसापासून व्हायरल होतोय, ज्यात ती गाडीत बसून रडते आहे..मात्र यामागचं वास्तव काहीतरी वेगळंच आहे.

गौरी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवसापासून व्हायरल होतोय... ज्या व्हिडिओत असं दाखवलं जातंय की गौरी खान आपल्या गाडीत बसून रडतेय..गौरी खान मुलगा आर्यन खानला भेटायला एनसीबी ऑफिसमध्ये गेली होती. त्यावेळी गौरीसोबत शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी देखील हजर होती. व्हिडीओमध्ये गौरी खान गाडीमध्ये बसलेली दिसत आहे. तिला अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे. अश्याप्रकारचा व्हिडिओ सोशल मिडीयावरून आणि माध्यमातून गेले दोन दिवस व्हायरल होताना दिसत आहे. मात्र आम्ही या व्हिडिओची सत्यता तपासली ज्यात हा व्हिडिओ तोच आहे. पण या विडियोमधली व्यक्ती मात्र गौरी खान मुळात नाहीये

फोटो- मंगेश आंब्रे
फोटो- मंगेश आंब्रे

तुम्ही हे दोन फोटो पाहिलेत तर तुम्हांला कळेल की गाडीत बसलेली ही व्यक्ती गौरी खान नाहीये.. ही व्यक्ती शाहरूख खानची नातेवाईक आहे. हा व्हिडिओ गुरवारचा असून मुंबईतील एनसीबी अॉफिसच्या जवळपास एका गाडीत ही व्यक्ती आणि शाहरूखची मँनेजर पूजा ददलानी सोबत आली होती. मात्र ही व्यक्ती गाडीतच बसून राहिली होती.. माध्यमांच्या कँमेऱ्यांनी जेव्हा गाडीचे व्हिज्युलस घ्यायला सुरवात केली तेव्हा तिने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.. यानंतर शाहरूखची मँनेजर पूजा ददलानी गाडीत आली आणि नंतर ही गाडी त्याठिकाणाहून निघून गेली. मात्र हीच दृश्य गौरी खान आर्यन खानला एनसीबी अॉफिसमध्ये भेटायला आली होती आणि नंतर गाडीत बसून रडत होती अश्याप्रकारे दोन दिवस सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आली.. मुळात गौरी खान त्याठिकाणी नव्हतीच आणि ही व्यक्ती शाहरूख खानची नातेवाईक आहे असं या व्हिडिओतून आता स्पष्ट झालं आहे..

Related Stories

No stories found.