Big Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात रंगणार तृप्ती देसाई vs शिवलीला पाटील यांच्यात सामना

कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या बिग बॉस या रिअँलिटी शोमध्ये तृप्ती देसाई या डँशिंग सामाजिक कार्यकर्त्या तर दुसरीकडे किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांची एंट्री झाली आहे
Big Boss Marathi 3:  बिग बॉसच्या घरात रंगणार तृप्ती देसाई vs शिवलीला पाटील यांच्यात सामना

कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या बिग बॉस या रिअँलिटी शोमध्ये तृप्ती देसाई या डँशिंग सामाजिक कार्यकर्त्या तर दुसरीकडे किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांची एंट्री झाली आहे.भूमाता बिग्रेड संघटनेच्या संस्थापक प्रमुख असलेल्या तृप्ती देसाईंची महिलांना न्याय,हक्क आणि समान संधी मिळावी यासाठी आंदोलन करण्याकरिता ख्याती आहे. त्यांनी २०१६ मध्ये शनि शिंगणापूर मंदिरात शनि देवाची पूजा करण्याचा अधिकार महिलांनाही मिळावा यासाठी आंदोलन केले होते. तर दुसरीकडे किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील अवघ्या पाच वर्षांच्या असल्यापासून किर्तन करत आहेत. आजवर १० हजारांहून अधिक किर्तनांचा टप्पा त्यांनी पार केलाय. खास करून तरूण पिढीचं नेतृत्व करणाऱ्या शिवलीला तरूणांसाठी समाजप्रबोधनाचं काम करतात.

यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई विरूध्द शिवलीला पाटील हे वॉर चांगलंच रंगणार आहे. इतर सेलिब्रेटींपेक्षा या दोघींचं क्षेत्र वेगळं आहे. पण दोघींची शब्दावर असलेली हुकुमत बघता बिग बॉसच्या घरात वेगळंच भजन किर्तन एेकू येणार अशी शक्यता आता या दोघींमुळे दिसत आहे. तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करत असताना सर्व स्पर्धकांना मोडेन पण वाकरणार नाही असा इशारा दिला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणाऱ्या तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात कशा राहणार आणि पुढे काय होणार हे कार्यक्रमाच्या पुढील भागांतून कळेल .

शिवलीला यांनी बिग बॉसमध्ये एंट्री करताच शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्याशी गप्पा मारल्या. दरम्यान शिवलीला यांचे आई-वडिल त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आई-वडिलांना त्यांचे नाव शिवलीला का ठेवले आहे असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे डोळे पाणावले होते. शिवलीला यांच्या आईने सांगितले की लग्नाच्यानंतर जवळपास सात वर्ष त्यांना मुल झाले नव्हते. नंतर त्यांनी शिवलीला ग्रंथांचं १०८ वेळा पारायण केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बाळ झाल्याचं स्वप्न पडले. शिवलीला यांच्या आईने त्यांना आईला याबाबत सांगितले तर त्यांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. शिवलीला यांच्या आई डॉक्टरकडे गेल्या तेव्हा डॉक्टरांनी त्या प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांनी मुलीचे नाव शिवलीला असं सांगितलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आता शिवलीला यांच्या किर्तनाच्या जादूने स्पर्धकांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आणि दुसरीकडे तृप्ती देसाई विरूध्द शिवलीला पाटील हा सामना बिग बॉसच्या घरात चांगलाच गाजणार आहे.

Related Stories

No stories found.