Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीला आविष्कारला असं काय म्हणाली स्नेहा...

आपला पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकरला खिजवण्यासाठी स्नेहा वाघने बिग बॉसच्या घरात आता एल्गार करायला सुरवात केली आहे.
Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीला आविष्कारला असं काय म्हणाली स्नेहा...

जो माझा होऊ शकला नाही तो दुसऱ्यांचा काय होणार हे शब्द आहेत स्नेहा वाघचे ..आपला पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकरला खिजवण्यासाठी स्नेहा वाघने बिग बॉसच्या घरात आता एल्गार करायला सुरवात केली आहे... बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमध्ये स्नेहा आणि आविष्कार दोघे स्पर्धक म्हणून एकत्र आले आहेत. बिग बॉसने नवीन आठवड्यात स्पर्धकांना मोटरसायकलवर बसून राहण्याचा टास्क दिलाय.. ज्यात स्नेहा आणि आविष्कार वेगवेगळ्या टीममध्ये आहेत.. जेव्हा आविष्कारच्या टीममधले स्पर्धक विशाल आणि विकास मोटारसायकलवर बसून होते. आणि स्नेहाच्या टीममधले स्पर्धक त्यांना तिथून उठवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत.. यावेळी मीरा आणि स्नेहा यांनी विकास आणि विशालला बाहेरून सपोर्ट करणाऱ्या आविष्कारला टारगेट करण्यास सुरवात केली.

बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात स्नेहाने आविष्कारबद्दल बोलणं टाळलं होतं. मात्र दुसऱ्या आठवड्यात दिलेल्या टास्कमध्ये स्नेहा आविष्कारला सरळसरळ टारगेट करताना दिसली. विशाल,विकासला सपोर्ट करणाऱ्या आविष्कारला उद्देशून स्नेहाने जो माझा झाला नाही तो ह्यांचा काय होणार, या माणसावर विश्वास ठेवू नका असं जोरजोरात ओरडून बोलत होती.. आणि आविष्कारला टारगेट करण्याचा प्रयत्न करत होती. ज्याने आविष्कारही हैराण झाला होता.

दुसरीकडे विशाल आणि विकासला मोटारसायकलवरून उठवण्यासाठी जय, गायत्री ह्यांनी जंग जंग पछाडले.. पावडर, तेल ह्याचा वापर करून त्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. तर बाकीचे स्पर्धक विलास आणि विशालला पर्सनल कमेंट करून त्रास देत होते. शेवटी विकासने बिग ब़ॉससमोर मीराला चँलेज दिलं की जेव्हा तुमच्या टीमची मोटारसायकलवर बसण्याची वेळ येईल तेव्हा तू आणि स्नेहा पहिल्यांदा मोटारसायकलवर बसून दाखव... शिवलीला अजून आजारी पडल्याने बिग बॉसने अधिक उपचारासाठी काही दिवस तिला घराबाहेर येण्यासाठी सांगितलं आहे. अखेर विशाल आणि विकास शेवटपर्यंत मोटारसायकलवर बसून राहिले आणि तो राऊंड जिंकले.. कँप्टन उत्कर्षने बिग बॉसला हा राऊंड ए टीम जिंकली आहे असं जाहीर केलं. पण खरी कसोटी अजून बी टीम जेव्हा उद्या मोटारसायकलवर बसतील आणि ए टीम त्यांना जो त्रास होईल तो राडा बघण्यासारखा असेल पण स्नेहा आणि आविष्कारमुळे घरात पर्सनल अँटँक व्हायला सुरवात झाली आहे.

Related Stories

No stories found.