Advertisement

Aamir Khan Kiran Rao Divorce : आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट इथे झाली? कसं बहरलं आमिर आणि किरण रावचं प्रेम?

ब्बल 15 वर्षाच्या संसारानंतर या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लगान’च्या सेटवर पहिल्यांदा भेट झाल्यानंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रुपांतर सहजीवनात झालं.
Aamir Khan Kiran Rao Divorce : आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट इथे झाली? कसं बहरलं आमिर आणि किरण रावचं प्रेम?

मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानने पत्नी किरण रावपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तशी पोस्टच व्हायरल केली आहे. तब्बल 15 वर्षाच्या संसारानंतर या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लगान’च्या सेटवर पहिल्यांदा भेट झाल्यानंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रुपांतर सहजीवनात झालं. त्यानंतर आता दोघेही विभक्त होत असल्याने दोघांच्याही चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट ‘लगान’च्या सेटवर झाली होती. स्वत: आमिरनेच त्याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. त्यावेळी किरण माझ्यासाठी फक्त माझी टीम सदस्य होती. ती असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. रीनाला (पहिली पत्नी) घटस्फोट दिल्यानंतर मी किरणला भेटलो. त्यावेळी आमची खास बातचीत झाली नाही. त्यावेळी ती माझी मैत्रीणही नव्हती, असं आमिरने सांगितलं होतं.

किरणच्या करिअरची सुरुवातही ‘लगान’पासूनच झाली होती. त्यानंतर तिने आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेस’साठीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्याशिवाय तिने ‘दिल चाहता है’ या सिनेमात कॅमिओ रोलही केला होता.किरण राव ही शाही कुटुंबातील आहे. तिचे आजोबा वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी हे तेलंगणा राज्यात आहे. किरण ही आदिती राव हैदरीची बहीण आहे. आदितीही शाही कुटुंबातील आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in