Who is Ananya Panday: ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलेली अनन्या पांडे नेमकी आहे तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अटकेत असतानाच आता दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हीचं देखील नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे अनन्या सध्या खूपच चर्चेत आहे. अनन्या पांडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. जाणून घेऊयात अनन्या नेमकी कोण आहे आणि ती नेमकी काय करते.

22 वर्षीय अनन्या पांडे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. तिने आपले शालेय शिक्षण धीरूभाई इंटरनॅशनल अंबानी स्कूलमधून पूर्ण केले आहे.

अनन्याने एका मोठ्या बॅनरच्या सिनेमासह बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने तिला पहिला ब्रेक दिला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा हिरो होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा काही चालला नाही. पण अनन्या लोकांचा पसंतीस उतरली होती. यासाठी अनन्याला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अनन्या 2019 साली पती पत्नी और वो या चित्रपटात दिसली होती. यानंतर, 2020 मध्ये तिने ‘खाली पीली’ या चित्रपटात काम केले. अल्पावधीतच अनन्या पांडे ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा बनली.

ADVERTISEMENT

अनन्याकडे अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीही आहेत. आगामी प्रोजेक्टचा विचार केल्यास तिचा पुढील सिनेमा हा शकुन बत्रासोबत आहे. यामध्ये दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहेत. याशिवाय, लाइगर हा चित्रपटही अनन्याने साइन केला आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे.

ADVERTISEMENT

अनन्याच्या लव्ह लाईफबद्दल मागे बरीच चर्चा होती. यावेळी तिचे नाव शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरशी जोडले गेले आहे. अनन्या ईशानसोबत अनेक वेळा स्पॉट झाली आहे. दोघांच्या रोमान्सच्या चर्चा वारंवार होतात. पण अनन्याने तिच्या नात्याबाबत आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जर आपण अनन्या पांडेच्या मित्रांचा विचार केल्यास शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर या तिच्या ‘बेस्ट फ्रेंड’ आहेत. त्या दोघींहीसोबत ती अनेकदा परदेशी फिरण्यााठी देखील जाते. जेथील अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

अनन्या पांडे आणि वाद

अनन्या पांडे आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. अनन्यासोबत शिकणाऱ्या मुलीने तिच्या अभ्यासाबद्दल खुलासा केला होता. त्यात मुलीने असं म्हटलं होतं की, अनन्याचा कॉलेज प्रवेश हा बनावट असल्याचे सांगितले होते. यावेळी अनन्याबद्दल सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला होता की, तिने दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात कधीही प्रवेश घेतला नाही.

यानंतर, अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या प्रवेशाशी संबंधित कागदपत्रांचे काही फोटो शेअर केले होते आणि असं म्हटलं होतं की, ‘मला हे करायचे नव्हते, पण याचा परिणाम माझ्या कुटुंबावर आणि मित्रांवर होत आहे. चित्रपटाच्या शूटिंगमुळे अभ्यासक्रमातील प्रवेश दोन वेळा पुढे ढकलावा लागला, पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे प्रवेश घेता आला नाही.’

अभिनेत्री अनन्या पांडेचा ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध?; एनसीबीने का टाकली घरावर धाड?

एका मुलाखतीत अनन्याने नेपोटिझमवरून वाद निर्माण केला होता. ती म्हणाली होती की, मला नेहमीच माझ्या वडिलांसारखा अभिनेता व्हायचं होतं. दुसरीकडे, माझ्या वडिलांनी कधीच धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम केले नाही किंवा ते करण जोहरच्या शो कॉफी विथ करणला गेले नाहीत. लोकांना जेवढं सोप्पं वाटतं तेवढं ते सोप्पं नाहीए.

प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास आणि संघर्ष असतो. तिच्या या विधानावर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने उत्तर देताना असं म्हटलं होतं की, ‘जिथे आमची स्वप्ने पूर्ण होतात, तिथे त्यांचा संघर्ष सुरू होतो.’ तिच्या या स्टेटमेंटमुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT