Bigg Boss Marathi 3 आज घराबाहेर कोण जाणार? सोनाली, जय की तृप्ती देसाई?

महेश मांजरेकरांनी घेतली बिग बॉसच्या सदस्यांची शाळा, आज एक सदस्य पडणार घराबाहेर
Bigg Boss Marathi 3 आज घराबाहेर कोण जाणार? सोनाली, जय की तृप्ती देसाई?
बिग बॉस मराठी फोटो-कलर्स मराठी

बिग बॉस मराठी 3 हा तिसरा सिझन चांगलाच गाजतो आहे. आज रविवार म्हणजेच आज एक सदस्य घराबाहेर होणार आहे. गेल्या आठवड्यात जे नॉमिनेशन कार्य पार पडलं त्यामध्ये विशाल निकम, मीनल शहा, जय दुधाणे, तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील या सगळ्यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. दिवाळीचं तोरण ज्या फोटोंचं असेल ते लोक सेफ होतील असा टास्क होता. यातली लक्षवेधी बाब ठरली ती म्हणजे उत्कर्ष शिंदेने जयला नॉमिनेट केलं आणि गायत्रीला सेफ केलं. आता शनिवारी महेश मांजरेकरांनी जी चावडी घेतली त्या चावडीवर त्यांनी मीरा, जय, उत्कर्ष, तृप्ती देसाई, मीनल या सगळ्यांना झापलं. सोनाली पाटीलला खास शब्दात खडे बोल सुनावले. आता आज रविवार आहे आज एक सदस्य घराबाहेर जाणार आहे तो सदस्य कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या आठवड्यात एकूण पाच सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. हे सदस्य होते विशाल निकम, मीनल शाह, जय दुधाणे, तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील. जेव्हा पाच सदस्य नॉमिनेट होतात त्यावेळी त्यातले दोन सदस्य शनिवारीच सेफ होतात. त्याप्रमाणे शनिवारी महेश मांजरेकरांनी सांगितल्याप्रमाणे आणि लोकांनी दिलेल्या मतांप्रमाणे दोन सदस्य सेफ झाले आहेत. हे सदस्य आहेत मीनल शहा आणि विशाल निकम. विशाल गेल्या आठवड्यातही नॉमिनेट झाला होता. मात्र लोकांनी त्याला सेफ केलं आहे. तसंच मीनलनेही फेअर गेम खेळल्याने लोकांनी तिलाही सेफ केलं आहे.

डेंजर झोनमध्ये आहेत तीन स्पर्धक

डेंजर झोनमध्ये जय दुधाणे, तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील हे तीन स्पर्धक आहेत. या तिघांपैकी दोन स्पर्धक म्हणजेच तृप्ती देसाई आणि जय दुधाणे अत्यंत तुल्यबळ समजले जातात. तर सोनाली पाटील ही तशी कमकुवत स्पर्धक आहे. ती उत्तम खेळाडू आहे पण बिग बॉसच्या घरात तिचा खेळ असा विशेष दिसलेला नाही. त्यामुळे सोनाली पाटीलला जर मतं कमी मिळाली तर ती आज घराबाहेर पडू शकते. देवमाणूस या सीरियलमध्ये तिने काम केलं आहे. ती कोल्हापूरची आहे, मात्र बिग बॉस मराठीच्या घरात तिची जादू म्हणावी तशी दिसू शकलेली नाही

तृप्ती देसाई यादेखील एक स्ट्राँग स्पर्धक आहेत. संचालक म्हणूनही त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र दोनदा त्यांना महेश मांजरेकरांकडून ऐकूनही घ्यावं लागलं आहे. याही आठवड्यात पणत्यांच्या टास्कसाठी त्या संचालक होत्या. आज जर त्यांना घराबाहेर पडल्या तर तो बिग बॉस मराठीतल्या इतर सदस्यांसाठी धक्का असू शकतो.

जय दुधाणे हादेखील सर्वात स्ट्राँग स्पर्धक मानला जातो. आज जर तो घराबाहेर पडला तर सर्वात जास्त वाईट वाटेल ते उत्कर्ष शिंदेला. तसंच घरातल्या इतर सदस्यांनीही वाईट वाटेल. मीराला कॅप्टन बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. गायत्री, मीरा, जय, उत्कर्ष आणि स्नेहा हा एक ग्रुपच बिग बॉसच्या घरात तयार झाला आहे. अशात जय बाहेर पडला तर सर्वाधिक वाईट उत्कर्षला वाटणार आहे कारण त्याने स्ट्रॅटेची प्लान करून जयला नॉमनेट केलं होतं. जय घराबाहेर पडणार नाही असा विश्वास त्याला होता. जर तो बाहेर केला तर सर्वात जास्त दुखावला जाणार आहे तो उत्कर्ष शिंदे. आता आज नेमकं कोण घराबाहेर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in