Bhonga: चार वर्षांपूर्वी तयार झालेला 'भोंगा' सिनेमा मनसे आताच का करतोय प्रदर्शित?

MNA Bhonga Movie: मनसे आता आपला भोंग्यांचा मुद्दा अधिक प्रखरपणे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भोंगा हा मराठी सिनेमा 3 मे रोजी प्रदर्शित करणार आहे.
Bhonga: चार वर्षांपूर्वी तयार झालेला 'भोंगा' सिनेमा मनसे आताच का करतोय प्रदर्शित?
why is mns release movie bhonga which was made four years ago now raj thackeray hindutva loudspeakers

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यात अक्षरश: रान उठविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी कधी हनुमान चालीसा तर कधी महाआरती असे वेगवेगळे कार्यक्रम हाती घेऊन मनसैनिकांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नवी उर्जा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असताना आता मनसेने आता आपली भोंग्यांबाबतची भूमिका अधिक ठामपणे मांडण्यासाठी थेट सिनेमाचा आधार घेतला आहे. ‘भोंगा’ (Bhonga)या सिनेमाचे निर्मिती हक्क घेऊन मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखच आज (21 एप्रिल) घोषित केली आहे.

मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत अमेय खोपकर यांनी राज ठाकरे यांची भोंग्यांविरोधातील मोहीम ही काही धार्मिक नव्हे तर सामाजिक मुद्द्यांवर आहे आणि त्याचा भूमिकेवर 2018 साली तयार झालेला हा सिनेमा 3 मे रोजी प्रदर्शित केला जाणार असल्याचं स्पष्ट केलं.

‘भोंगा’ हा मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा सिनेमा सिनेमाघरात प्रदर्शितच होऊ शकला नाही. त्यामुळे आता मनसेने देखील योग्य 'टायमिंग' साधत या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त निश्चित केला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर, दुसरीकडे मनसेकडून 3 मे रोजीच 'भोंगा' हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.

'भोंगा' सिनेमा नेमका कशावर?

ज्या अर्थी मनसे 'भोंगा' हा सिनेमा प्रदर्शित करणार आहे ते पाहता मशिदीवरील अजान आणि त्याच्याशी निगडीत असणार हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र या सिनेमाचा कथानक काहीसं वेगळं आहे.

'भोंगा' सिनेमा हा एका कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बाळाला झालेल्या दुर्धर आजार आणि त्याचवेळी होणारा भोंग्याचा त्रास यावर बेतला आहे. सिनेमातील कथानकाप्रमाणे बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दुर्धर आजार झालेला असतो. या आजारामुळे बाळाला उच्च ध्वनीचा त्रास होतो. तर भोंग्यांच्या त्रासामुळे या बाळाच्या तब्येतीवर देखील सतत परिणाम होऊन त्याचा त्रास वाढतो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव पाहतो. हा त्रास कमी करण्यासाठी गावं नेमकं करतं हेच या चित्रपटातून आपल्याला मिळणार आहे.

why is mns release movie bhonga which was made four years ago now raj thackeray hindutva loudspeakers
"...तर मोदींना सांगा आणि संपूर्ण देशातले भोंगे उतरवा", शिवसेनेचा राज ठाकरेंना खोचक सल्ला

दरम्यान, या सिनेमात अभिनेत्री दिपाली कुलकर्णी, दिप्ती धोत्रे, आकाश घरत, सुधाकर बिराजदार, कपिल गडसुरकर, अमोल कागणे, अरुण गीते, श्रीपाद जोशी, दिलीप डोंबे, रमेश भोळे असे अनेक नवखे कलाकार असणार आहेत.

आताच का प्रदर्शित केला जातोय भोंगा?

भोंगा हा सिनेमा साधारण चार वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली तयार झाला होता. पण तेव्हा तो प्रदर्शित होऊ शकला नव्हता. पण आता मनसेने भोंग्याविषयी जी भूमिका हाती घेतली आहे. त्यासाठी हा सिनेमा त्यांच्या प्रचाराचा एक प्रभावी मुद्दा ठरु शकतो म्हणूनच प्रदर्शित केला जात आहे. याचबाबत सिनेमाचे निर्माते अमेय खोपकर यांना विचारलं असतं त्यांनी मुंबई Tak सोबत बोलताना असं म्हटलं की, कोरोनाच्या एकूण काळात सिनेमागृह बंद होते म्हणून तेव्हा हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नव्हता. पण आता कोरोनाचं सावट दूर झालं आहे. त्यामुळे सिनेमा आता प्रदर्शित केला जाता आहे.

Related Stories

No stories found.