लोकमान्य टिळक लहानपणी LIC चं पुस्तक वाचतं होते का? त्या फोटोवरुन ‘झी मराठी’ ट्रोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : बदल घडत नाही तो घडवावा लागतोय हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहे, ते लोकमान्य टिळक या दृष्टीकोनातून समजून घेणं, जाणून घेणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन झी मराठी वाहिनी ‘लोकमान्य’ ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा येत आहे. येत्या २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मात्र त्यापूर्वीच या मालिकेच्या प्रमोशन निमित्त करण्यात आलेल्या एका फोटोवरुन झी मराठीला सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. या फोटोमध्ये लोकमान्य टिकळ यांचं बालपण दाखविण्यात आलं आहे. सोबतच त्यांच्या बाजूला पुस्तकांचा मोठा गठ्ठा आणि हातातही एक पुस्तक आहे असल्याचं दाखविलं आहे.

‘झी मराठी’ला का व्हावं लागलं ट्रोल?

पण याच हातातील पुस्तकावर नेटकऱ्यांनी LIC चा लोगो असल्याचं हेरलं अन् सोशल मिडिया झी मराठीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने हा फोटो पाहून टिळक पण म्हणतील झी मराठीचं डोकं ठिकाण्यावर आहे का? असं म्हटलं आहे. तसंच टिळकांचं निधन 1920 झालं आणि LIC ची स्थापना 1956 साली झाली असं निदर्शनास आणून दिलं आहे. तर एका युजरने लोकमान्य LIC चं पुस्तक वाचत होते, हे इतिहासात नाही सांगितलं, असा उपहासात्मक टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, या मालिकेमध्ये लोकमान्य टिळक यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील.

ADVERTISEMENT

ते जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होते. घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल. ह्या मालिकेचं लेखन केलं आहे आशुतोष परांडकर यांनी तर स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्मिते आहेत. या मालिकेतून अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT