Weight Loss: फक्त उभं राहून तुमचं वजन होईल कमी?
वजन घटवण्यासाठी अनेक उपाय आणि पर्याय शोधले जात असतात मात्र असे काही उपाय असतात ज्यासाठी कोणताच खर्च येत नाही. तो उपाय म्हणजे उभे राहून काम करणे, प्रवास करणे त्याचा इतका मोठा फायदा होतो की, तुमचे वजन झटपट कमी होत जाते.
ADVERTISEMENT
Weight Loss: जी लोकं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना हे नक्की माहिती आहे की, उभा राहूनही कॅलरी बर्न होतात. याबाबत 27 वर्षाच्या अन्वितानेही जे ऐकलं होत, ते तिने सांगितले आहे. कारण तिचे वजन जास्त असल्यामुळे ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अन्विताने ऐकले होते की, तुम्ही बराच वेळ उभा राहिल्यास तुमच्या कॅलरी बर्न (Burn calories) होतात आणि त्यामुळे तुमचे वजनही कमी होते. त्यांच्या ऑफिसमध्येही अनेक लोकं ही उभे राहून डेस्कवर काम करत असतात. त्यामुळे ते कॅलरी बर्न करू शकतील. जे स्टँडिंग डेस्क (Standing desk) म्हणजे ज्या डेस्कवर उभे राहून काम करता येते, त्याला स्टँडिंग डेस्क असं म्हणतात. त्यामुळे अन्वितालाही हे जाणून घ्यायचे आहे की, स्टँडिंग डेस्करवर काम करावे का? त्यामुळे खरचं जास्त कॅलरी बर्न होतात का? आणि त्याचे उत्तर सकारात्मक असेल तर किती वेळ उभा राहावे असे सवालही तिला पडले आहेत. यावरच तज्ज्ञांनी काय सांगितले आहे तेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
उभा राहणे महत्वाचे
जर तुम्ही कॅलरीजबद्दल चर्चा करत असाल तर बसण्यापेक्षा उभे राहिल्यामुळेच जास्त कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे दोन्हींमध्ये बर्न केलेल्या कॅलरीजमध्येही जास्त असा फरक नाही. मात्र उभा राहणे हेच फार महत्वाचे आहे. कारण बसून काम करताना कमी उर्जा वापरली जाते.
हे ही वाचा >> ठाकरेंच्या ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट?, निनावी फोनने मुंबई पोलीस दलात खळबळ
आकुंचन पावलेले स्नायू
शरीराचा एक नियम आहे, यूज इट और लूज इट त्यामुळे ज्यावेळी मेंदूला काही गरज वाटत नसेल तर त्याचा काही उपयोग मेंदूकडून केला जात नाही. जर एखाद्याच्या हाताला फ्रॅक्चर झाला तर 2 महिन्यानंतर त्याच्या हाताला प्लास्टर असते, मात्र ते काढल्यानंतर हाताचे स्नायू आकुंचन पावलेले असतात. कारण हात फ्रॅक्चर झालेली व्यक्ती दोन महिने कोणतेही काम करत नाही. त्यामुळे शरीर जर उभे राहून असेल तर मात्र त्याच्याकडून अधिक काम केले जाते.
हे वाचलं का?
जास्त कॅलरी बर्न
कोणतंही काम बसून करत असताना त्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. मात्र तेच शरीर उभे राहून काम करताना मात्र त्यामध्ये संतुलन आणि स्नायूंचे काम वाढलेले असते. उदाहरणार्थ उभे राहून काम करताना मणक्याभोवती असलेले स्नायू आपला तोल सांभाळत असतात. तर पोटाच्या बाजूला असलेले स्नायूही शरीराचा तोल सांभाळतात. त्यामुळे बसण्यापेक्षा उभा राहूनच जास्त कॅलरी बर्न होत असतात.
वय, लिंग आणि स्नायू
कोणतीही व्यक्ती किती कॅलरीज बर्न करू शकेल हे अनेकदा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. वय, लिंग आणि स्नायू यावर सगळं अवलंबून असते. ज्या व्यक्तीच्या शरीरात जास्त मांसपेशी असतात तो जास्त कॅलरी बर्न करू शकतो. म्हणजेच शरीर विश्रांती घेत असले तरी त्याचे स्नायू कॅलरीज बर्न होऊ शकतात. मात्र चरबीच्या बाबतीत मात्र असं होत नाही.
ADVERTISEMENT
अतिरेकही टाळा
प्रौढ व्यक्ती ज्याचे वजन 70 ते 75 किलो असते ते बसून 1 तासात 120 ते 130 कॅलरीज बर्न करू शकते. मात्र त्याच व्यक्तीने एक तास उभे राहिल्यास 175 ते 200 कॅलरीज बर्न करू शकते. एका तासामध्ये जास्त फरक पडत नाही, मात्र तीन ते चार तास उभे राहिल्यास खूप कॅलरीज बर्न होऊ शकतात. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेकही धोकादायक असू शकतो हे ही प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
ADVERTISEMENT
स्नायूंचे संतुलन बिघडते
सतत उभे राहिल्यास शरीराच्या खालचा भागाला सूजही येऊ शकते. त्यामुळे शरीरा काय सूचना देते त्याच्याकडेही तुम्ही लक्ष दिले पाहिजे. तुम्ही बराच वेळ बसून असाल तर 3 ते 5 मिनिटे उभे राहून शरीराला ताण द्या, कारण सलग काही वेळ बसल्याने स्नायूंचे संतुलन बिघडत असते.
उभा राहू्नच प्रवास
कॅलरीज बर्न करणे हेदेखील लिंगावर अवलंबून असते, त्यामुळे पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त कॅलरी बर्न करतात. कारण पुरुषांच्या शरीरात स्नायूंचे प्रमाण अधिक असते. त्यातच तुम्ही ट्रेन किंवा बसने ऑफिसला जात असाल तर कॅलरी बर्न करण्यासाठी उभा राहूनच प्रवास करा. तर जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटे चालत जाणे गरजेचे आहे.
हे ही वाचा >> हवी होती मुलगी.. पण तिसरा मुलगा होताच बापाने घेतला चिमुकल्याचा जीव
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT