Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांच्या खात्यात 4500 कधी जमा होणार? सरकारने दिली मोठी अपडेट
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून 4500 खात्यात जमा होणार आहे. मात्र हे पैसे कधी जमा होणार आहेत. याची उत्सुकता महिलांमध्ये आहे. त्यात आता सरकारकडून या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
त्या महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे.
सरकारकडून या संदर्भात मोठी अपडेट समोर
महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत 31 जुलैआधी अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे 3000 रूपये जमा झाले आहेत. या महिलांना आता सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. त्यात ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केला आहे, त्यांना या योजनेचा लाभ कधी मिळणार आहे? त्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme Verification of application will begin at the district level and 4500 deposite to your bank account mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)
ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून 4500 खात्यात जमा होणार आहे. मात्र हे पैसे कधी जमा होणार आहेत. याची उत्सुकता महिलांमध्ये आहे. त्यात आता सरकारकडून या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत.ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सूरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का? याकडे लक्ष द्यावे.
दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरु आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT