Navratri 9 Colours 2024: साडीवर असा घाला ब्लाऊज की सगळेच...
Navratri 9 Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवशी सजून-धजून रंगांनुसार कपडे परिधानकरण्याची क्रेझ महिलांमध्ये प्रचंड असते. अशावेळी आज आपण नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्यांवर क्रॉन्ट्रस ब्लाउज कसे कॅरी करायचे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
नवरात्रीच्या 9 दिवशी सजून-धजून रंगांनुसार कपडे परिधानकरण्याची क्रेझ महिलांमध्ये प्रचंड असते.
अशावेळी आज आपण नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्यांवर क्रॉन्ट्रस ब्लाउज कसे कॅरी करायचे जाणून घेऊया.
शारदीय नवरात्र गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे, या दिवशी पिवळा रंग आहे. पिवळ्या रंगाच्या साडीवर महिलांना हिरवा, निळा, लाल अशा रंगाचे क्रॉन्ट्रस ब्लाउज कॅरी करता येतील जे उठावदार दिसतील.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दुसऱ्या दिवशी हिरवा रंग आहे. हिरव्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचे ब्लाउज कॉम्बीनेशन खूप शोभून दिसते. त्याचबरोबर पिवळा रंगही सुरेख दिसतो.
तिसऱ्या दिवशी राखाडी रंग आहे. राखाडी रंगाच्या साडीवर गुलाबी, लाल किंवा निळ्या रंगाचा ब्लाउज खूप उठून दिसतो.
ADVERTISEMENT
चौथ्या दिवशी नारंगी रंग आहे. नारंगी रंगाची साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा कॉन्ट्रस ब्लाउस हे कॉम्बीनेशन उत्तमच आहे.
ADVERTISEMENT
पाचव्या दिवशी पांढरा रंग आहे. पांढरा रंगाच्या साडीवर कोणत्याही गडद रंगाचा ब्लाउज कॅरी करा ते सुंदरच दिसतं.
सहाव्या दिवशी लाल रंग आहे. लाल रंगाच्या साडीवर हिरवा, पिवळ्या रंगाचे ब्लाउज भारीच दिसतात. तुम्हीपण कॅरी करू शकता.
सातव्या दिवशी निळा रंग आहे. निळ्या रंगाच्या साडीवर नारंगी, गुलाबी असे रंग खुलून दिसतात. त्यामुळे तुम्ही या कॉम्बीनेशमध्ये एक नंबरच दिसाल.
आठव्या दिवशी गुलाबी रंग आहे. गुलाबी रंगाच्या साडीवर जांभळा, हिरवा, पिवळा, निळा असे गडद रंग खूप छान दिसतात.
नवव्या दिवशी जांभळा रंग आहे. तुम्ही हे कॉम्बीनेशन कधी केलं नसेल पण जांभळ्या रंगाच्या साडीवर नारंगी रंगाचा ब्लाउज जबरदस्त दिसतो.
ADVERTISEMENT