Rustom: नौदलाच्या ‘रूस्तम’ची खरी कहाणी! भारतात का ठरलं होतं हे बहुचर्चित प्रकरण?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

The True story of the Rustom Movie : एक माणूस दुसऱ्या माणसाला गोळ्या घालतो. आणि पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण करतो. न्यायाधीशाला माहीत आहे, वकिलाला माहीत आहे, खून कोणी केला हे साऱ्या जगाला माहीत आहे. कबुलीही खुनीनेच दिली आहे. पण तरीही ज्युरी त्याला निर्दोष घोषित करते. आज आपण भारतातील सर्वात आश्चर्यकारक आणि बहुचर्चित प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यावर अनेक चित्रपट बनले. मोठमोठे लेख लिहिले गेले. हे प्रकरण इतकं प्रसिद्ध झालं की ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आणि लोकांनी कोर्टात रांगा लावल्या. ही कहाणी K. M. Nanavati (नानावटी प्रकरण) आणि महाराष्ट्र राज्य प्रकरणाची आहे. (Rustom Movie Which Based On KM Nanavati His Real Story)

ADVERTISEMENT

27 एप्रिल 1959 रोजी मुंबईतील एका पोलीस ठाण्यात नौदलाची वर्दी घातलेला एक माणूस दाखल होतो. तिथे उपस्थित इन्स्पेक्टर लोबोला तो सांगतो, ‘मी एका माणसाला गोळी मारली आहे.’ यावेळी इन्स्पेक्टर लोबो यांना माहित होते की कोणाबद्दल बोललं जात आहे. ते म्हणतात, ‘तो माणूस मेला आहे. हा मेसेज मला नुकताच गामदेवी पोलीस ठाण्यातून आला.’ वर्दीतला व्यक्ती उभाच होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. लोबो त्याला विचारतात, ‘तुम्ही चहा पिणार का?’ तो उत्तर देतो, ‘नाही, फक्त एक ग्लास पाणी.’ यानंतर तो खुर्चीवर बसतो.

हे वाचलं का?

मुंबईत अग्नितांडव, गोरेगावातील भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू

हत्येनंतर आत्मसमर्पण करणाऱ्या या व्यक्तीचं नाव के.एम.नानावटी असं होतं. नानावटी हे पारशी समाजाचा होते. भारतीय नौदलात ते लेफ्टनंट कमांडर होते. त्यांच्या पत्नीचं नाव सिल्विया होतं. 1949 मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये वाढलेल्या सिल्व्हियाशी लग्न केलं. तीन मुले होती. दोन मुलगे आणि एक मुलगी. जनजीवन सामान्य होतं. नानावटी, यांनी दावा केल्याप्रमाणे, त्यांचं सिल्व्हियावर खूप प्रेम होतं. पण नंतर या प्रेमापोटी एक दिवस ते खुनी झाले.

के.एम.नानावटी यांनी हत्या का केली?

1959 रोजी अनेक महिने समुद्रात घालवून नानावटी मुंबईला परतले. पण यावेळी त्यांना सिल्व्हियाच्या वागण्यात काही बदल दिसला. सुरुवातीला त्यांना वाटले की त्यांची पत्नी रागावली आहे कारण त्यांना अनेक महिने समुद्रात राहावे लागले. त्यामुळे दोघेही कमी वेळ एकत्र घालवू शकले. पण नंतर बरेच दिवस सिल्व्हियाच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही, तेव्हा त्यांनी तिला स्पष्टपणे कारण विचारलं. ज्यानंतर सिल्व्हियाने जे सांगितलं ते ऐकून नानावटींना धक्काच बसला. सिल्व्हिया दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडली होती.

ADVERTISEMENT

सिल्व्हियाने एका पार्टीत मुंबईचे उद्योगपती प्रेम आहुजा यांची भेट घेतली आणि हळूहळू दोघेही प्रेमात पडले. ही गोष्ट ऐकून नानावटी शांतपणे घरातून निघून गेले. घरातून त्यांनी थेट नौदल मुख्यालय गाठले. तिथे त्यांना त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर मिळाली. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर आपली कार वळवली.

ADVERTISEMENT

यावेळी ते मुंबईत मलबार हिल्स, जीवन ज्योती बिल्डिंग येथे पोहोचले. ही तीच इमारत होती ज्यात प्रेम आहुजा राहत होते. नानावटी घरात शिरले आणि आहुजा यांच्याशी बोलू लागले. काही वेळाने बाहेर काम करणाऱ्या नोकराला काच फुटल्याचा आवाज आला. काही सेकंदांनी आतून गोळ्यांचा आवाज आला.. नोकर आत पळत सुटला. टॉवेल आणि रक्ताने माखलेला प्रेम आहुजाचा मृतदेह जमिनीवर पडल्याचे त्यांनी पाहिले. नानावटींच्या हातात बंदूक होती. प्रेम आहुजाची बहीण मॅमीही तिथे उपस्थित होती. तिने नानावटींकडे पाहिले.

नानावटी आहुजा यांच्या अपार्टमेंटमधून बाहेर आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले आणि आत्मसमर्पण केले. प्रकरण स्पष्ट होते. नानावटी यांच्या बंदुकीतून झाडलेल्या गोळीने आहुजा यांचा मृत्यू झाला. नानावटींना शिक्षा होणार हे निश्चित होते पण या प्रकरणात वेगळंच वळण येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं.

NCP Controversy: राष्ट्रवादी कुणाची ? आज काका-पुतणे आमनेसामने…

खटल्याची तारीख 23 सप्टेंबर 1959 होती. खचाखच भरलेल्या सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली. न्यायमूर्ती आर.बी.मेहता होते. याशिवाय ज्युरी कोर्टही उपस्थित होते. ज्युरी कोर्ट म्हणजे कोर्टाने खटल्याच्या सुनावणीसाठी निवडलेले लोक. हे समाजातील जाणते लोक होते, ज्यांच्यासमोर केसचे सर्व युक्तिवाद ठेवण्यात आले होते. त्यानंतर ज्युरी त्या खटल्याचा निकाल देईल.

नानावटी प्रकरणात 9 सदस्यांचे ज्युरी पॅनेल तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये एकूण 9 सदस्य होते. दोन पारशी, एक अँग्लो इंडियन, एक ख्रिश्चन आणि पाच हिंदू. सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील सीएम त्रिवेदी यांनी नानावटी यांच्यावर प्रेम आहुजाच्या हत्येचा आरोप केला. प्रसिद्ध फौजदारी वकील कार्ल जे खंडालावाला बचाव पक्षाकडून खटला लढवत होते.

न्यायालयात काय घडलं?

खंडालावाला यांनी न्यायालयात युक्तिवाद सुरू केला. नानावटी यांनी कट रचून खून केल्याचे सांगितले. पुरावे सादर केले. 24 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. इन्स्पेक्टर लोबो, ज्यांच्यासमोर नानावटी यांनी आत्मसमर्पण केले होते, त्यांनीही साक्ष दिली. परंतु नानावटी यांनी लोबो यांच्याकडे दिलेला कबुलीजबाब ज्युरींनी ग्राह्य धरला नाही कारण साक्ष दंडाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली नाही. लोबो यांनी न्यायालयात लिहूनले आणि म्हटले. ‘नानावटी यांनी आत्मसमर्पण केले तेव्हा त्यांनी नौदलाची वर्दी घातली होती. पण त्यावर रक्ताचा एकही डाग नव्हता.

लोबो यांच्या या वक्तव्यावर आहुजाची केस लढणाऱ्या वकिलांनी सांगितले की, ‘नानावटींनी जाणूनबुजून आहुजाला दुरूनच मारले म्हणून हे घडले, जेणेकरून कोणताही पुरावा राहू नये.’

आता नानावटींच्या जबाबाची वेळ होती. न्यायालयात त्यांनी वेगळीच कहाणी सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार हे खरं नव्हतं, हा फक्त एक अपघात होता. नानावटी यांनी सांगितले की, तो सिल्वियाशी लग्न करणार का हे विचारण्यासाठी त्या दिवशी आहुजाकडे गेला होता. नानावटींच्या म्हणण्यानुसार, प्रेम आहुजा यांनी बोलण्याऐवजी भांडण सुरू केले. प्रेम आहुजाने त्याला सांगितले की, ‘मी त्या प्रत्येक स्त्रीसोबत लग्न करू का? जिच्यासोबत मी झोपलो आहे. येथून निघून जा.’

यावरून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाल्याचे नानावटी यांनी पुढे सांगितले. नानावटी यांच्या हातात असलेले रिव्हॉल्व्हर खाली पडले. नानावटी आणि आहुजा या दोघांनीही त्याला उचलण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी अचानक गोळी झाडली गेली. नानावटी यांनी आपल्या बचावात असा युक्तिवाद केला की, जर त्याला खरोखर प्रेम आहुजाचा खून करायचा असता तर तो घरात शिरताच गोळीबार करू शकला असता. हा युक्तिवाद कितपत योग्य होता हे अजून ठरवायचं होते. पण त्याच दरम्यान न्यायालयाबाहेर आणखी एक नाट्य तयार होत होतं.

यमाच्या रेड्यावर बसून मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांची मौज, सामनातून सरकारवर आगपाखड

25 पैशांचे वर्तमानपत्र 2 रुपयांना विकले गेले…

त्यावेळी ब्लिट्झ नावाचे मासिक प्रकाशित होत असे. ज्याचे संपादक रुसी करंजिया होते. करंजिया पारशी समाजातून आले होते. नानावटी प्रकरणात त्यांनी उघडपणे नानावटींची बाजू घेतली. वर्तमानपत्रात चार पानांचे कव्हरेज प्रकाशित केले. ब्लिट्झ हा साप्ताहिक पेपर होता, तरीही ब्लिट्झप्रमाणे इतर कोणत्याही वृत्तपत्राने नानावटी प्रकरणाचे कव्हर केले नाही. इथे जनताही हळूहळू नानावटींना साथ देऊ लागली. कमांडर नानावटी नौदलात होते. ते न्यायालयात हजर राहिले तेव्हा बघ्यांची गर्दी झाली होती. चाहत्यांमध्ये महिलांची संख्या जास्त होती.

नानावटींची क्रेझ एवढी होती की, न्यायालयाच्या गॅलरीत मुली नटून थटून यायच्या. द न्यू यॉर्करच्या पत्रकार एमिली हॅनच्या मते, मुली ऑपेराला जात असल्यासारखे कपडे घालून यायच्या. या केसमध्ये बदला, लव्ह ट्रायअँगल आणि कोर्टरूम ड्रामा होता. आणि याचा सर्वाधिक फायदा ब्लिट्झ वृत्तपत्राला झाला. शनिवारी प्रसिद्ध झालेले हे वृत्तपत्र विकत घेण्यासाठी शुक्रवारीच स्टँडवर लोक जमले होते. 25 पैशांचे हे वर्तमानपत्र त्यावेळी 2 रुपयांना विकले गेले. बाहेर असे नाटक असताना न्यायालयात काय घडलं?

नानावटी यांच्यानंतर त्यांची पत्नी सिल्विया न्यायालयात हजर झाली. त्यांचे हे विधान महत्त्वाचे होते. सगळ्यांच्या नजरा सिल्व्हियाकडे लागल्या होत्या. ती बोलू लागली, “जोपर्यंत मी आहुजासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही तोपर्यंत तो माझ्याशी लग्न करेल असे वचन देत होता. पण जेव्हा शारीरिक संबंध झाले तेव्हा तो पलटला.”

यावेळी सिल्व्हियाने नानावटींनी सांगितलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती केली. सिल्व्हियाच्या म्हणण्यानुसार, तिने नानावटी यांना प्रेम आहुजासोबतच्या नात्याबद्दल सांगितले. तेव्हा नानावटींनी तिला विचारले की, आहुजाशी लग्न करणार का? यावर सिल्व्हियाने कोणतेही उत्तर दिले नाही. नानावटी यांनी तिला आहुजाला भेटणार असल्याचे सांगितले. सिल्व्हियाच्या म्हणण्यानुसार तिने नानावटींना रोखण्याचा खूप प्रयत्न केला. आहुजा त्यांना गोळ्या घालेल असंही सांगितलं. असं असूनही नानावटी आहुजा यांच्याकडे गेले.

यावर बरीच चर्चा झाली पण या संपूर्ण प्रकरणात एक प्रश्न कायम होता. बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले की, नानावटी यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरच्या मुद्द्यावरून त्यांनी हत्येची योजना आखल्याचे स्पष्ट झाले. असा प्रश्न नानावटी यांना न्यायालयात विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दावा केला की, मला स्वतःवर गोळी मारायची होती. सिल्व्हियानेही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली. पक्षकार आणि विरोधकांच्या युक्तिवादानंतर आता न्यायालयाचा निकाल देण्याची वेळ आली. मारेकरी कोण हे जगाला कळलं. तरीही न्यायाच्या दिवशी काहीतरी विचित्र घडलं.

21 ऑक्टोबर 1959 रोजी न्यायाधीशांनी ज्युरीला निर्णय देण्यास सांगितले. संध्याकाळचे साडेचार वाजले होते. ज्युरींनी थोडा वेळ मागितला. तास गेला. लोकांची गर्दी वाढली. संध्याकाळी साडेसात वाजता ज्युरी परत आले आणि त्यांनी त्यांचा निकाल देत म्हटलं, ‘कमांडर नानावटी या हत्येचे दोषी नाही, नॉट गिल्टी.’

प्रेम आहुजाच्या हत्येचा आरोपही ज्युरींनी फेटाळला. ज्युरीच्या 9 पैकी 8 सदस्यांनी या निर्णयाच्या बाजूने मतदान केले. निकाल येताच कोर्टरूममध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. नानावटी वाचल्याचा आनंद बहुतेकांना झाला. पण यादरम्यान, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मेहता यांनी एक गोष्ट सांगितली, त्यामुळे घटनास्थळी शांतता पसरली. ज्युरीचा निर्णय असूनही, न्यायाधीश मेहता यांनी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवले. म्हणाले, ‘न्यायासाठी हे आवश्यक आहे.’

NCP : शरद पवारांचा ‘तो’ मोठा दावा प्रफुल पटेलांनी खोडून काढला, म्हणाले…

उच्च न्यायालयात नानावटी प्रकरण

उच्च न्यायालयात नानावटी प्रकरणात बचाव पक्षाचे सर्व युक्तिवाद चालले नाहीत. नानावटी यांना उच्च न्यायालयात दोषी ठरवण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, तिथे उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. नानावटी यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचा दाखला देत मुंबईचे राज्यपाल म्हणाले की, ‘नानावटी प्रकरणाची नौदल कोठडी प्रलंबित आहे, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.’ तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नौदल प्रमुखाचे अपील आणि कायदा मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर नानावटी यांच्या शिक्षेला स्थगिती देऊन त्यांची रवानगी नौदलाकडे सोपवण्याचा सल्ला राज्यपालांना दिला. या प्रकरणावरही राजकारणाचा परिणाम दिसून आला.

नानावटींची सुटका कशी झाली?

नानावटी हे पारशी होते तर प्रेम आहुजा हे सिंधी समाजाचे होते. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण दोन समाजातील सन्मानाचा लढा बनले. अनेकजण नानावटींना माफ करण्याचे आवाहन करत होते. नानावटींना माफ करणारी ब्लिट्झने पहिल्या पानावर मोहीम चालवली होती. सरकारमधील अनेक लोकही नानावटींची वकिली करत होते. तरीही सरकार घाबरले कारण, नानावटींच्या सुटकेवर सिंधी संतापले असते. पण त्यानंतर आणखी एक प्रकरण समोर आले, ज्याचा नानावटी प्रकरणावर मोठा परिणाम झाला.

भाई प्रताप हे सिंधी व्यापारी होते. बनावट परवाना प्रकरणी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. भाई प्रताप यांना सिंधींचा पाठिंबा होता. त्याच्या सुटकेची मागणी होऊ लागली. दोन युक्तिवाद करण्यात आले. गुन्हा छोटा असून दुसरा स्वातंत्र्यसैनिक पार्श्वभूमीचा आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी पुढे येऊन तडजोड केली.भाई प्रताप यांच्या सुटकेच्या बदल्यात नानावटी यांचीही सुटका होईल, अशी अट होती. दोन्ही बाजूंनी एकमत झाले.

यानंतर, प्रेम आहुजाची बहीण मॅमीने नानावटींना माफ करण्याची लेखी विनंती केली आणि मुंबईच्या राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांनी नानावटी आणि भाई प्रताप या दोघांची त्याच दिवशी तुरुंगातून सुटका केली. 17 मार्च 1964 ही तारीख होती. तीन वर्षांपेक्षा कमी काळ तुरुंगात राहिल्यानंतर नानावटी यांची तुरुंगातून सुटका झाली. कमांडर नानावटी यांचे 2003 मध्ये निधन झाले. मात्र, त्यांचे हे प्रकरण प्रसिद्ध झाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT