‘हे’ 4 पदार्थ फ्रिजमध्ये ठेवताच बनतात विषारी, कोणते आहेत ते पदार्थ?
घरात बनवलेले अन्न पदार्थ उरले किंवा ते अधिकचे झाले की, सहजपणे ते फ्रीजमध्ये ठेवले जातात. मात्र काही अन्न पदार्थ हे फ्रीजमध्ये ठेवल्या ठेवल्या ते विष बनत असतात. आणि त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयापासून ते अगदी मूत्रपिंडावरही होऊ शकतो.
ADVERTISEMENT
Health Tips : सध्या अनेक माणसं ही चांगलं आरोग्य राखण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न करतात. निरोगी राहण्यासाठी आणि कोणतेही आजार होऊ नयेत यासाठी चांगला आहार (diet) असणे हे महत्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही काय, केव्हा आणि कसे खात आहात याकडेही लक्ष देणे गरजेचे असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला लागणारे अन्न कसे साठवता तेही महत्वाचं आहे. अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी व साठवण्यासाठी नक्कीच रेफ्रिजरेटरचा (Refrigerator) तुम्ही वापर केला जातो. मात्र अनेकदा फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवण्याआधी गांभीर्याने विचार करायला हवा. कारण काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या खराब होऊन त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. फ्रीजमध्ये ठेवलेल्या काही गोष्टी या इतक्या खराब होतात की, त्या कधी कधी विषारीही बनू शकतात.
ADVERTISEMENT
घातक बुरशी
आहाराविषयी आणि फ्रीजमध्ये ठेवण्यात येत असलेल्या अन्न पदार्थांविषयी माहित सांगताना डॉ. विनोध शर्मा म्हणाले की, रोज तुम्ही खात असलेल्या काही गोष्टी या रेफ्रिजरेटरमध्ये कधीही ठेवू नका, कारण काही अन्न पदार्थांना लगेच बुरशी लागते. बुरशीजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात कर्करोगाच्या गाठी बनून त्याचा धोका तुमच्या आरोग्यालाही होऊ शकतो.
कॅन्सर टाळता येतो
जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी रोजी पाळला जातो, त्यानिमित्ताने कर्करोगाविषयी जनजागृत्ती करण्यासाठी अनेक पातळीवर मार्गदर्शन केले जाते आहे. त्यामुळे कॅन्सर कसा टाळता येतो, कॅन्सर झाला तर त्यावर उपाय काय आहेत, त्याच्यावर उपचार कसे केले जातात, त्याविषयी आता मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनही केले जाते आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Mamata Banerjee: ‘मी इंडिया आघाडीचाच भाग, पण…’
भात
जेवण बनवताना अनेकदा काही लोकं जास्त भात बनवतात आणि तो भात जर उरला तर तेच तांदूळ नंतर रेफ्रिजरेटरमध्य ठेवला जातो. मात्र भात रेफ्रिजरेटरमध्ये 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवला तर त्याचे वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होतात. कारण भातावर बुरशी धरू शकते, आणि त्याच बॅक्टेरिया नंतर तुमच्या शरीरात कर्करोगाच्या गाठी तयार करतात. त्यामुळे फ्रीजमध्ये भात ठेवताना विचार करूनच तो ठेवणे गरजेचे आहे.
आले
लोकं ज्यावेळी बाजारामध्ये जातात त्यावेळी कोणतीही वस्तू स्वस्त दरात मिळाली की, ती जादाचीच खरेदी करतात. त्यामुळे कधी आलेही जर बाजारात स्वस्त मिळाले तर ते अधिकच खरेदी करून ते फ्रीजमध्ये ठेवले जाते. मात्र ती चूक कधीच करू नका, कारण त्यामुळे त्याचा प्रचंड वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होतो. कारण आले फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला बुरशी धरते, आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या मूत्रपिंड आणि यकृतावर होतो, ते खराबही होऊ शकते.
ADVERTISEMENT
लसूण
लसूणही अनेकदा स्वस्त मिळाली की ती जादा खरेदी करून तीही फ्रीजमध्ये ठेवली जाते. मात्र लसूणवरही खूप वाईट परिणाम होतो, कारण लसूणला बुरशी लागून तेही विषारी बनते असंही आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे विशेषतः सोललेली लसूण फ्रीजमध्ये न ठेवण्याचा सल्ला देतात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Toilet मुळे घटस्फोटपर्यंत प्रकरण, दोन वर्ष सासरीच गेला नाही जावई!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT