Western Railway : दहावीत उत्तीर्ण आहात! रेल्वेत निघालीय बंपर भरती

मुंबई तक

ADVERTISEMENT

western railway recruitment 2024 5066 apprentice post 22 october last date for application
रेल्वेत तब्बल 5000 जागांसाठी बंपर भरती,
social share
google news

Western Railway Recruitment 2024 : रेल्वेत नोकरी करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्यामुळे कधी एकदा भरती सुरू होते आहे आणि अर्ज करतोय, असे नेहमीच तरूणांचे होते. अशाच तरूणांसाठी रेल्वेने मोठी भरती आणली आहे.  या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या जवळपास पाच हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने याबाबतची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे.  (western railway recruitment 2024 5066 apprentice post 22 october last date for application) 
  
पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत एक मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या जवळपास पाच हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने याबाबतची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे, त्यामुळे 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. या भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे. पश्चिम रेल्वे भरती 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Video : सुप्रिया सुळे यांचं भाषण सूरू होताच 'जय श्रीराम'च्या घोषणा, पुढे काय घडलं?

शैक्षणिक पात्रता काय? 

पश्चिम रेल्वे भरतीअंतर्गत एकूण 5066 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवार 50 टक्के गुणांसह 10 वी पास असावा, तसेच त्याने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेला असणं गरजेचं आहे. आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही निवड केली जाणार आहे.

वयाची अट: 22 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे  असणे आवश्यक आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष, तर ओबीसीसाठी 3 वर्षाची सूट असणार आहे. 

हे वाचलं का?

अर्जाती फी किती ?

खुला/ ओबीसी प्रवर्ग 100 रुपये फी असणार आहे. तर मागासवर्गीय/ महिला/ PWD साठी कोणतेही शुल्क नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024 (05:00 PM).

ADVERTISEMENT

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

ADVERTISEMENT

जाहिरात (Western Railway Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online Western Railway Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हे ही वाचा : पुण्यात अख्खा ट्रक खड्ड्यात.. शिंदे-फडणवीसांवर पुणेरी टीका, पवार गटाने डिवचलं!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT