भारतातच नाही तर थायलंडमध्येही आहे ‘अयोध्या’! प्रभू रामाशी नेमकं कनेक्शन काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

What is Connection of Thailand Ayuttaya With India's Ayodhya
What is Connection of Thailand Ayuttaya With India's Ayodhya
social share
google news

Thailand connection to Ayodhya : तुम्हाला हे माहितीये का? की, थायलंडमध्ये (Thailand) एक 674 वर्ष जुनी एक जागा आहे, जिथे अनेक मंदिरे आणि अवशेष आहेत. या ठिकाणाचे नाव भारतातील अयोध्याशी (Ayodhya) जोडलेले आहे. युनेस्कोने (UNESCO) हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हे ठिकाण इतिहासप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे. ते पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. (What is Connection of Thailand Ayuttaya With India’s Ayodhya)

ADVERTISEMENT

या शहराचे नाव ‘अयुथ्या’ (Ayuttaya) आहे. जे थाई, ख्मेर आणि बर्मीज वास्तुकलेच्या आश्चर्यकारक मंदिरे, अवशेष आणि प्रभावी मिश्रणासाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक गोष्टींची आवड जोपासणारे आणि प्रवाशांसाठी अयुथ्या हे नेहमीच एक आकर्षक ठिकाण राहिले आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रवाशांसाठी कारण, अयुथ्या आणि भारतातील प्राचीन आध्यात्मिक शहर अयोध्येचे खास कनेक्शन आहे.

वाचा : Ram Mandir: शंकराचार्यांचा नारायण राणेंवर पलटवार, राम मंदिरावरून मोठं राजकारण

थायलंडमधील अयुथ्या शहराचा प्राचीन इतिहास काय?

अयुथ्या या प्राचीन शहराची स्थापना 1350 मध्ये पहिले शासक रामथीबोडी यांनी केली होती. या शहराने चार शतकांहून अधिक काळ सियामी साम्राज्याची (सध्याचे थायलंड) दुसरी राजधानी म्हणून काम केले. आणि काळसोबत हे एक शक्तिशाली आणि महानगरीय व्यापारिक केंद्राच्या रूपात विकसित झाले. चाओ फ्राया नदीच्या किनारी वसलेल्या या शहराच्या रणनीतिक स्थितीने निश्चित रूपात समुद्री व्यापार आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण सोपी केली.

हे वाचलं का?

अयुथ्या आणि अयोध्या ही दोन नावं केवळ ऐकण्यातच सारखी वाटत नाहीत तर या दोन शहरांचा सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधही आहे. दोन शहरांमधील संभाव्य संबंध शोधण्यासाठी अनेक विद्वान आणि इतिहासकारांनी ऐतिहासिक कथांवरही संशोधन केले आहे.

वाचा : शरद पवारांचा वसुलीचा धंदा, 435 कोटी…, किरीट सोमय्यांनी सांगितलं प्रकरण

अयुथ्या आणि अयोध्येचे कनेक्शन काय?

अयुथ्यामध्ये थेरवडा बौद्ध धर्म आणि हिंदू-ब्राह्मण परंपरा यांचे सुंदर मिश्रण पाहिले जाऊ शकते. हे मिश्रण या प्रदेशातील सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता दर्शवते. अयुथ्या या प्राचीन शहराचे नाव अयोध्या, रामाचे जन्मस्थान, हिंदू धर्म आणि रामायण यांच्याशी जोडलेले आहे. अयुथ्याचे पहिले शासक, राजा रामाथीबोडी, यांनी या प्रदेशाच्या संस्कृतीवर रामायणाचा प्रभाव प्रतिबिंबित करून शहराला हे नाव दिले. चक्री घराण्यातील राजांसह नंतरच्या राजांनी राम हे नाव धारण केले आणि प्रभू रामाशी असलेला संबंध आणखी दृढ केला.

ADVERTISEMENT

वाचा : Thane: बाप रे! कंबरेत घुसलेली सळई तरूणाच्या थेट जांघेतून आरपार

अयुथ्याला आकर्षक बनवणारी गोष्ट म्हणजे रामकीयेन. खरं म्हणजे रामायणाची ओळख बौद्ध धर्मप्रचारकांनी आग्नेय आशियामध्ये केली होती. हे नंतर रामकीयेन नावाच्या थाई आवृत्तीमध्ये रुपांतरित झाले. हे अयुथ्या साम्राज्याच्या काळात घडले. अशाप्रकारे रामाच्या जीवनाचा थाई संस्कृतीवर झालेला परिणाम आपण पाहतो.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेकासाठी अयुथ्या येथून माती आणण्यात आली आहे. यामुळे थायलंडमधील अयुथ्या आणि भारतातील अयोध्या यांच्यातील संबंध अधिक दृढ होतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT