Ajit Pawar : ''...तर आम्ही वेगळा विचार करू'', अजित पवार गटाचा भाजपला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar ncp warn bjp on mahayuti lok sabha election 2024 devendra fadnavis eknath shinde shiv sena
जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे.
social share
google news

Ajit Pawar Ncp : लोकसभा निवडणुकीतील राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवारांच्या राष्ट्रवादीस जबाबदार धरले जात आहे. तसेच काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझेशन या मासिकातून थेट अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य करण्यात आलं होते. त्यामुळे महायुतीतील काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत. असे असताना आता अजित पवारकडून पहिल्यांदाच भाजपला थेट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते काय म्हणाले आहेत हे जाणून घेऊयात.  (ajit pawar ncp warn bjp on mahayuti lok sabha election 2024 devendra fadnavis eknath shinde shiv sena) 

महायुतीच्या पराभवास अजित पवारांना जबाबदार धरल्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला आहे. 

हे ही वाचा : फडणवीस सरकारमध्ये राहणार की जाणार? दिल्लीत झाला मोठा निर्णय

अमोल मिटकरी म्हणाले की,  ''भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल,'' अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता महायुतीत खटके उडायला सुरूवात झाल्याच चित्र आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : '...तर उद्धव ठाकरेंचा फायदा होईल..', प्रकाश आंबेडकरांचं प्रचंड मोठं विधान!

ऑर्गनायझरच्या लेखात काय? 

महाराष्ट्रात अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे पुरेसे बहुमत असताना देखील अजित पवार यांना का सोबत घेतलं? असा सवाल संघ स्वयंसेवक रतन शारदा यांनी या लेखात उपस्थित केला आहे.

अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध लढा दिला गेला, पण सत्तेसाठी काँग्रेसच्या लोकांना भाजपने सोबत घेतलं, ज्यामुळे कार्यकर्त्यांना बरंच दु:ख झालं. भगवा दहशतवादाचा आरोप करणाऱ्या आणि 26/11 ला आरएसएसचा कट म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यामुळे संघाचे स्वयंसेवक दुखावले गेलेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT