Mumbai Tak Chavdi: 'एकनाथ शिंदे हेच भावी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेंनी...', भास्कर जाधवांचा मोठा दावा
Bhaskar Jadhav on Eknath Shinde: एकनाथ शिंदे हे भावी मुख्यमंत्री असतील हे उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं होतं. असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. जाणून घ्या भास्कर नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भास्कर जाधव यांचा मुंबई Tak चावडीवर मोठा दावा
ठाकरे हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद देणार होते
परिस्थिती बदलल्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्री पद घ्यावं लागलं, जाधवांचा दावा
Bhaskar Jadhav: मुंबई: शिवसेना (UBT) चे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना एक मोठा दावा केला आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री होते असं विधान भास्कर जाधव यांनी केलं आहे. (uddhav thackeray had agreed that eknath shinde would be the future chief minister bhaskar jadhav big claim on mumbai tak chavdi)
ADVERTISEMENT
आगामी विधानसभा निवडणुकीआधी मुंबई Tak चावडीवर आलेल्या भास्कर जाधव यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. मात्र, त्यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय आणि 2019 साली मुख्यमंत्रिपदाबाबत नेमका काय निर्णय घेण्यात आला होता याबबत भाष्य केलं आहे.
'2019 साली शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण...'
'एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले म्हणून कुणालाही मत्सर नाही. कोणालाही वाईट वाटायचं कारण नाही. मी तुम्हाला सांगतो की, ज्यावेळस 2019 विधानसभा निवडणूक झाली त्या वेळेला सेना भवनमध्ये आमची जी बैठक झाली त्यावेळी विधीमंडळ नेता हे एकनाथ शिंदे यांनाच करण्यात आलं होतं.'
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Mumbai Tak Chavadi : 'बाळासाहेबांनी राणेंना दिलेला 'हा' शाप', भास्कर जाधवांनी हे काय सांगितलं...
'याचा अर्थ जर सहजासहजी मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर ते एकनाथ शिंदेनाच मिळणार होतं. कारण जो विधीमंडळ नेता होतो त्यालाच केलं जातं हे संकेत आहेत हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे उद्धव साहेबांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंना विधीमंडळ नेता म्हणून नेमलं गेलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना डावलणं हा विषय नाही.'
'नंतर बदलली परिस्थिती.. त्यावेळेस आपण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलेलो नव्हतो. शिवसेना आणि भाजप अशीच खेचाखेची सुरू होती की, मुख्यमंत्री... आणि भाजपचं म्हणणं काय होतं की, आम्ही एक दिवस पण मुख्यमंत्री पद देणार नाही. पहिलं द्या दुसरं द्या.. कधी तरी द्या.. उद्धव साहेब सांगत होते की, एकदा ठरवा मी मंत्रालयासमोर बोर्ड लावतो.. तुम्ही म्हणाल त्याच्या आदल्या दिवशी मी राजीनामा देतो..'
ADVERTISEMENT
'त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले याबाबत मत्सर नाही. एकनाथ शिंदे हे मागून येऊन पुढे गेले म्हणून त्याबाबतचा राग नाही... नरेटिव्ह नरेटिव्ह म्हणून पसरविण्याचं जे काम चालतं ना ते.. हे चालतं.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Shiv Sena UBT: उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया, हृदयात होते ब्लॉकेज...नेमकं काय घडलं?
'एकनाथ शिंदे हेच भावी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेंनी मान्य केलेलं होतं. नंतर आपला पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाला.. हे लक्षात घ्या.'
'उभ्या आयुष्यभर ज्या-ज्या गोष्टी मिळाल्या त्या बाळासाहेबांनी आम्हालाच दिल्या ना.. आम्हाला म्हणजे कोणाला दिलं असेल ज्याला-त्याला...'
'एक पद जर त्या ठाकरे घराण्यात आलं तर आम्ही म्हणायला हवं होतं की, कधी तरी एक पद त्या ठाकरे घराण्याला मिळालं ना... हरकत नाही.. चला सर्वांनी पाठिंबा देऊया.'
'मलाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. मीही नाराजी व्यक्त केली होती. आजही मी ते बोलतो.. होय माझा हक्क होता तो डावलला गेला. नव्हता माझा हक्क? एकनाथ शिंदेंपेक्षा सीनियर मी होतो.. एकनाथ शिंदेंची चौथी टर्म आणि माझी सहावी टर्म... पण मी त्या पदाकरिता बोललो नाही तर मला मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं असं मी बोललेलो.. त्यामुळे हे जे काही एकनाथ शिंदे एक रिक्षावाला, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून ठाकरे जळतात असं काही नाही.'
'हे साफ खोटं आहे.. ज्या पद्धतीने ते मुख्यमंत्री झाले त्या पद्धतीने ते व्हायला नको होतं.. शेवटी हा डाग लागला तो कायमचा...' असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT