AC Local : मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या, वेळापत्रक जाहीर

AC Local : रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानंतर मुख्य मार्गावर एसी लोकलच्या १२ फेऱ्या वाढणार
AC Local : मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या, वेळापत्रक जाहीर
Ac local rounds on central railway line increased schedule announced

मध्य रेल्वेच्या मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या एसी लोकलच्या तिकिट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे की एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानंतर मुख्य मार्गावर एसी लोकलच्या १२ फेऱ्या वाढणार आहेत. एकूण रेल्वे मार्गावर सध्या ४४ फेऱ्या होतात त्याची संख्या आता ५६ होणार आहेत. १४ मे म्हणजेच उद्यापासून १४ एसी लोकल सेवा या रूळांवर धावणार आहेत. हार्बर मार्गावरील एसी लोकल मेन लाईनवर आणि मेन लाईनच्या नॉन एसीसेवा हार्बर लाईनवर हलवण्याच्या निर्णय रेल्वेने घेतला आहे, त्यामुळे गाड्यांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही.

रेल्वेने ५ मे रोजी एसी लोकलच्या तिकीट दरांमध्ये कपात केली आहे. त्यानंतर लोकलमधल्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही संख्या वाढल्याने एसी लोकलची सेवा वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्ये रेल्वे मार्गावर सध्या १८१० लोकल धावतात. त्यापैकी ८९४ सेवा मेन लाईनवर, ६१४ हार्बरवर, २६२ हार्बरवर आणि ४० सेवा कॉरिडॉरवर म्हणजेच उरण लाईन धावतात. सध्या मध्य रेल्वेकडे एसी लोकलचे ५ रेख आहेतत्यात चारमधून सेवा चालवली जात आहे तर एकाची दुरूस्ती सुरू आहे.

मुंबई लोकल एसी लोकलच्या तिकिटांमध्ये ५० टक्के कपात केल्यानंतर एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मुंबईत एसी लोकल सुरू झाल्या खऱ्या मात्र त्यांच्या फेऱ्या मर्यादित आणि भाडं भरमसाठ होतं. त्यामुळे या दरांमध्ये कपात करण्याची मागणी मुंबईकरांनी केली होती. आहेत त्या दरांमध्ये २० ते ३० टक्के कपात केली जाईल असं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात एसी लोकलच्या दरांमध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दर कमी करण्याविषयीचा एक प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला देण्यात आला होता. आता कपातीच्या निर्णयापाठोपाठ फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.