"...तर लाऊडस्पीकरवर येईल माणुसकीचा आवाज", अभिनेता सोनू सुदचं वक्तव्य चर्चेत

जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे सोनू सुदने?
Actor Sonu Sood On Loudspeaker & Hanuman Chalisa Controversy to be broken
Actor Sonu Sood On Loudspeaker & Hanuman Chalisa Controversy to be broken

मशिदींवरच्या भोंग्यांवरून महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी सरकारला ४ मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातल्या मशिदींवरचे भोंगे आणि त्यावरून चांगलंच राजकारण पाहण्यास मिळालं. तसंच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं. अशात अभिनेता सोनू सुदचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

काय म्हणाला आहे सोनू सुद?

"भोंग्यांचा वाद खूपच दुःखद आहे. धर्म, जातीतून बाहेर पडल्यानंतर जेव्हा बाहेर पडाल तेव्हा लाऊडस्पीकरवर अजान किंवा हनुमान चालीसा नाही तर त्या लाऊडस्पीकरवर माणुसकीचा आवाज येईल. जेव्हा लोक अडचणीत होते, जेव्हा ऑक्सिजनची गरज होती तेव्हा लोकांनी कधीही जात धर्म पाहिला नाही. तेव्हा देशाला लोक जोडले गेले. आता हीच वेळ आहे धर्म आणि जात यातून बाहेर पडून काम केलं पाहिजे." असं सोनू सुदने म्हटलं आहे.

Actor Sonu Sood On Loudspeaker & Hanuman Chalisa Controversy to be broken
"भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे बाळासाहेबांचं ऐकणार की नाही? राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मला वाटतं देशाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आपण धर्म आणि जात यापासून बाहेर निघू. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे, तीच ताकद नमाजमध्ये आहे. देश एकत्र येणे हे जास्त महत्वाचे आहे. धर्म हा लोकांनी बनवला आहे. आपण यापासून बाहेर पडलं पाहिजे. देशात अनेक मोठे मोठे मुद्दे आहेत. राजकारणाने जनतेचे प्रश्न सोडवावे. आपण जर यातच अडकून राहील तर सामान्य लोकांच्या अडचणी कधीही संपणार नाहीत. पहिल्यांदा हे कस संपवायचं हे पहिले पाहिजे बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. असंही सोनू सूदनं म्हटलं होतं. आता त्याचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आहे.

Actor Sonu Sood On Loudspeaker & Hanuman Chalisa Controversy to be broken
अभिनेता सोनू सूदने 20 कोटींची करचोरी केली; आयकर विभागाचा दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जे भाषण केलं त्यात मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर १२ एप्रिलला झालेल्या सभेत ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. ३ मे रोजी ईद असल्याने त्यांनी ४ मेपासून मशिदींवरच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसा लावा असं आवाहन सगळ्यांना केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी मशिदींविरोधात हनुमान चालीसा लावण्यात आली होती. तसंच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं. शिवसेनेने राज ठाकरेंवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही राज ठाकरेंवर टीका केली होती. आता अभिनेता सोनू सुदचं वक्तव्यही चर्चेत आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in