Bombay HC: चुंबन घेणं आणि अवयवाला स्पर्श करणं लैंगिक गुन्हा नाही, आरोपीला जामीन मंजूर

कोर्टाने या प्रकरणातल्या आरोपीला ३० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आली आहे
Bombay HC: चुंबन घेणं आणि अवयवाला स्पर्श करणं लैंगिक गुन्हा नाही, आरोपीला जामीन मंजूर
Kissing and fondling are not unnatural says Bombay HC, grants bail to accusedसंग्रहित छायाचित्र

ओठांचं चुंबन घेणं आणि लैंगिक अवयवाला स्पर्श करणं हा अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा ठरत नाही असं निरीक्षण बॉम्बे हायकोर्टाच्या एकलपीठाने नोंदवलं आहे. एवढंच नाही तर १४ वर्षांच्या मुलाचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवून जामीनही मंजूर केला आहे.

या प्रकरणात पीडित मुलाच्या तक्रारीनंतर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७७ नुसार जे अनैसर्गिक लैंगिक आणि बालकांवरच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत म्हणजेच पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस एफआयआरनुसार, मुलाच्या वडिलांना त्यांच्या कपाटातून पैसे गायब आढळले. त्या मुलाने आरोपीला पैसे दिल्याचं सांगितलं. ऑनलाइन गेम 'ओला पार्टी'साठी रिचार्ज करण्यासाठी तो मुंबईतील उपनगरातील आरोपी व्यक्तीच्या दुकानात जात असे, असं या अल्पवयीन मुलाने सांगितलं.

एवढंच नाही तर या अल्पवयीन मुलाने हा आरोप केला आहे की एक दिवस तो रिचार्ज करायला गेला होता तेव्हा आरोपीने त्याच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि तक्याच्या प्रायव्हेट पार्टला चुकीच्या पद्धतीने हात लावला. ही बाब या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितली. ज्यानंतर मुलाच्या वडिलांनी बाल लैंगिक गुन्ह्यांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ च्या संबंधित कलमांतर्गत आरोपीविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला.

न्यायालयाने काय म्हटलं आहे?

जे प्रकरण समोर आलं आहे त्या प्रकरणात अनैसर्गिक लैंगिक संबंध ही बाब प्रथमदर्शनी लागू नाही. आरोपी एक वर्षापासून कोठडीत आहे. तसंच या प्रकरणी खटला लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. ही सगळी परिस्थिती आणि वस्तुस्थिती लक्षात घेता अर्जदाराला जामीन मिळण्याचा अधिकार आहे. मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पीडित मुलाने हे सांगितलं आहे की आरोपीने त्याच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. आपल्या मते सकृतदर्शनी आरोपीचं हे कृत्य लैंगिक गुन्हा होऊ शकत नाही असं निरीक्षण न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी नोंदवलं.

पीडित मुलाचा वैद्यकीय अहवाल वगळता कलम ३७७ लावण्यासाठी आणखी काय पुरावा आहे? असंही आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान विचारण्यात आलं होतं. मुलाच्या वैद्यकीय अहवालातूनही लैंगिक गुन्हा झाल्याचं दिसून येत नाही. वर्षभर आरोपी कारागृहात आहे त्यामुळे आता त्याला जामीन मिळण्याचा अधिकार आहे असंही कोर्टाने म्हटलं आहे.

पीडित मुलगा ऑनलाइन गेम रिचार्जसाठी गेला असताना आरोपीने ओठांचे चुंबन घेतल्याचे आणि प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याची तक्रार पीडित मुलाने त्याच्या वडिलांकडे केली होती. त्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ आणि ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in