पुणे हादरलं, सेल्फीने घेतला 5 तरुणींचा जीव; धरणात बुडून मृत्यू

पुणे हादरलं, सेल्फीने घेतला 5 तरुणींचा जीव; धरणात बुडून मृत्यू
five girls drowned in water at bhatghar dam in pune district(प्रातिनिधिक फोटो)

पुणे: पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात तब्बल पाच तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात ही दुर्दैवी घटना घडली असल्याचं समजतं आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे भाटघर धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या 5 तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. भोर तालुक्यातील नऱ्हे गावात हा अपघात घडला आहे. पोलीस आणि बचाव पथकाने रात्री उशिरा पाचही तरुणींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले होते.

मृत तरुणींची नावे:

  1. खुशबू लंकेश राजपूत (वय 19)

  2. मनीषा लखन राजपूत (वय 20)

  3. चांदनी शक्ती राजपूत (वय 21)

  4. पूनम संदीप राजपूत (वय 22)

  5. मोनिका रोहित चव्हाण (वय 23, सर्व रा. हडपसर, पुणे)

या पाचही तरुणींचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाला. या सर्व तरुणी एकाच कुटुंबातील असल्याचे समजते आहे.

याबाबत 'मुंबई Tak'सोबत बोलताना राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले की, मयत मुलगी हडपसर पुणे येथून भोर येथे आपल्या पाहुण्यांच्या घरी आल्या होत्या. दरम्यान, काल (19 मे) दुपारी या सर्व तरुणी व कुटुंबातील काही मुले भाटघर धरणावर पर्यटनासाठी गेले होते. धरणाच्या काठावर पाण्यात उतरल्यानंतर सेल्फी काढत असताना त्यांना पाण्याचे भान न आल्याने सर्व तरुणी पाण्यात बुडाल्या.

five girls drowned in water at bhatghar dam in pune district
अहमनदगरमध्ये शेततळ्यात बुडून सख्ख्या बहीण- भावाचा मृत्यू, सगळं गाव हळहळलं

एकमेकांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात सर्व तरुणी खोल पाण्यात बुडाल्या. त्यांच्यासोबत पर्यटनासाठी गेलेल्या मुलांनी याबाबत घरच्यांशी फोनवर बोलून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली.

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सह्याद्री रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाचारण करून तरुणींचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.

अखेर अडीच तासानंतर तरुणींचे मृतदेह सापडले. रात्री 10.15 वाजेपर्यंत चारही तरुणींचे मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आले होते. तर रात्री उशिरा पाचव्या मुलीच्या मृतदेहाचा देखील शोध लागला. या दुर्देवी अपघातानंतर राजपूत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in