Gunaratna Sadavarte : १८ दिवसांनी गुणरत्न सदावर्ते तुरुंगाबाहेर, पत्नीच्या डोळ्यात अश्रू

तुरुंगाबाहेर आल्यानंतर नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
Gunaratna Sadavarte : १८ दिवसांनी गुणरत्न सदावर्ते तुरुंगाबाहेर, पत्नीच्या डोळ्यात अश्रू

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. या सुटकेच्या वेळी त्यांची पत्नी आणि मुलगी या ठिकाणी आल्या होत्या. त्यांच्या सुटकेनंतर या दोघींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.

काय घडलं होतं?

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवार ८ एप्रिलला संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं. अचानक सिल्व्हर ओक येथे धडकलेल्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चपला भिरकावल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली.

२०२० मध्ये पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. काही वेळापूर्वीच गुणरत्न सदावर्ते ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांची तुरुंगाबाहेर वाट बघत होते. हम है हिंदुस्थानीच्या घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी तुरुंगाबाहेर दिल्या.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

भारताच्या संविधानापेक्षा मोठा कुणीही नाही. यापुढे आमचा केंद्रबिंदू असेल भ्रष्टाचार. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करणार आहोत. जय श्रीराम, जय भीम आणि हम है हिंदुस्थानी म्हणत त्यांनी घोषणाही दिल्या.

Related Stories

No stories found.