BMC : दुकानांवर मराठी लावण्याबद्दल मुंबई महापालिकेनं काय दिला इशारा?

31 मे आधी दुकानांवर लावाव्या लागणार मराठी पाट्या
BMC : दुकानांवर मराठी लावण्याबद्दल मुंबई महापालिकेनं काय दिला इशारा?

Marathi Boards अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुकानं आणि आस्थापना यांच्यावर मराठी फलकच लागले पाहिजेत असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आता मुंबई महापालिकेने दुकानं आणि आस्थापना, कार्यालयांना मराठीत करा अन्था कायदेशीर कारवाई केली जाईल असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेने दुकाने आणि आस्थापना विभागाने संबंधित प्रक्रियांचा अवलंब करण्याबाबत नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. प्रस्थापित व्यक्तींची नावे असलेल्या आणि किल्ल्यांची नावे असलेल्या किंवा चित्र असलेल्या आस्थापनांना ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व दुकाने आणि आस्थापनांना त्यांच्या नावाच्या फलकांमध्ये मराठी समाविष्ट करण्यासाठी त्यांच्या बोर्डमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. ही दुरुस्ती 31 मे 2022 पर्यंत आणावी लागेल.

BMC ने जोडले आहे की मराठी अक्षरांचा फॉन्ट आकार इतर भाषांमधील अक्षरांच्या फॉन्टच्या आकारापेक्षा लहान असू नये. शिवाय, दारूच्या दुकानांवर कोणत्याही महान व्यक्तिमत्त्वाचे नाव असू शकत नाही किंवा त्यांच्या बोर्डवर किल्ल्यांची नावे लिहू शकत नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

BMC : दुकानांवर मराठी लावण्याबद्दल मुंबई महापालिकेनं काय दिला इशारा?
मराठी पाट्या लावण्यास दुकानदारांचाच विरोध, नियम पाळणार नसल्याचं वक्तव्य

आदेशाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय कार्यालयात व्यापारी संघटनांचे सदस्य तसेच आस्थापनांचे मालक इत्यादींची बैठक बोलावण्यात येणार असल्याचंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.

राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. त्यानंतर याची अंमलबजावणी होत नव्हती.

अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असायचं. मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असायची. मात्र जानेवारी महिन्यात या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे.

मराठीत-देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली. हा निर्णय झाल्याने आता राज्यभरातील दुकानदारांना त्यांच्या दुकानावरची पाटी मराठीत करून घ्यावी लागणार आहे.

दुकान कोणतंही असलं तरीही पाटी मराठीत करावी लागणार आहे. इंग्रजी नावांना हरकत नसणार मात्र मराठी नावही तेवढंच मोठं द्यावं लागणार आहे. आधीच्या नियमात दुरूस्ती करत आता सरकारने हा नवा नियम लागू केला.

Related Stories

No stories found.