Covid 19 : मुंबईत दिवसभरात 11647 नवे रूग्ण, टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 19 टक्क्यांवर

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 19 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : मुंबईत दिवसभरात 11647 नवे रूग्ण, टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 19 टक्क्यांवर
कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)PTI

मुंबईत 11 हजार 647 नवे रूग्ण आढळले आहेत. मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 19 टक्के झाला आहे. मुंबईत दिवसभरात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 23 टक्के होता, तो 21 टक्के झाला आणि त्यानंतर 19 टक्के झाला. मुंबईतली रूग्णसंख्या स्थिरावते आहे असं चित्र आहे. मुंबईत आज 851 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

आज 14980 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 8 लाख 20 हजार 313 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज दिवसभरात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण 16 हजार 413 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 62 हजार 97 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला आहे. तर डबलिंग रेट 36 दिवसांवर गेला आहे.

कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह, आयसीयूमध्ये दाखल

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट दोन दिवसात 30 टक्क्क्यांवरून 20 टक्क्यांवर आला आहे. तर रोजची रूग्णसंख्या 20 हजार 700 वरून 11647 चार दिवसात आली आहे. मुंबईतले 80 टक्के बेड्स रिकामे आहेत. मागील 22 दिवसात 46 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज साधारण दोन मृत्यू होत आहेत.

कोरोना रूग्ण वाढल्याने हे निर्बंध

पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही

रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही

लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थिती

अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येणार

शाळा आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

थिएटर्स, नाट्यगृहं 50 टक्के उपस्थितीची मुभा

सलून आणि खासगी कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा

खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात यावं

पूर्ण लसीकरण झालेल्या सार्वजिनक बसने वाहतूक करण्यास मुभा

हॉटेल, रेस्तराँ रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळ पूर्णतः बंद

महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक

हॉटेल्स रेस्तराँमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलिव्हरी सेवा पूर्णवेळ सुरू राहणार

24 तास सुरू राहणारे कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार

दुकानं, हॉटेल्स रेस्तराँमध्ये काम करणाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतलेल्या असणं बंधनकारक

लसीचे दोन डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्तराँवर कारवाई केली जाणार

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in