Gujarat ATS : गुजरातमध्ये पुन्हा 600 कोटींचे हेरॉईन जप्त; पाकिस्तानातून आला साठा

मुंद्रा पोर्टवरील 3000 कोटी हेरॉईन सापडल्याच्या घटनेला महिना होत नाही, तोच गुजरातमध्ये पुन्हा एकदा 600 कोटी रुपये किमतीचे हिरॉईन जप्त...
Gujarat ATS : गुजरातमध्ये पुन्हा 600 कोटींचे हेरॉईन जप्त; पाकिस्तानातून आला साठा
गुजरात एटीएसने जप्त केले ६०० कोटींचं हेरॉईन.India Today

मुंद्रा पोर्टवरील 3000 कोटी हेरॉईन (heroin) सापडल्याच्या घटनेला महिना होत नाही, तोच गुजरातमध्ये पुन्हा एकदा 600 कोटी रुपये बाजारमूल्य असलेलं 120 किलो हेरॉईनचा (120 kg of heroin) साठा जप्त करण्यात आला आहे. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील झिनझुदा गावात गुजरात एटीएसने (Gujarat ATS) ही कारवाई केली आहे. हे हेरॉईन पाकिस्तानातून आल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. (Gujarat ATS seizes 120 kg of heroin worth Rs 600 crore in Morbi)

या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्तार हुसैन ऊर्फ जब्बार जोडिया, शमसुद्दीन हुसैन सय्यद आणि गुलाम हुसैन उमर भगद अशी एटीएसने कारवाई दरम्यान अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. गुजरात एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

गुलाम भगद आणि मुख्तार हुसैन यांनी हे हेरॉईन सुमुद्रीमार्गाने आणलं. पाकिस्तानी बोटीतून ते भारतात आणलं. हेरॉईनचं हे पार्सल पाकिस्तानी नागरिक असलेल्या झाहीद बशीर बलोच याने पाठवलं असून, तो 2019 मध्ये जप्त करण्यात आलेल्या 227 किलो हेरॉईन प्रकरणात फरार आहे, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली असल्याचं गुजरात एटीएसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

गुजरात एटीएसने जप्त केले ६०० कोटींचं हेरॉईन.
सुशांत प्रकरणानंतर मुंबईला म्हटलं गेलं ड्रग्ज कॅपिटल, बघा 3000 किलो ड्रग्स जाणार होतं कुठे?

पाकिस्तानातून आणण्यात आलेलं हे हेरॉईन भारतीय तस्करांकडे सुपूर्द केलं जाणार होतं. त्यानंतर ते आफ्रिकन देशात पाठवण्यात येणार होतं, असं गुजरात एटीएसने म्हटलं आहे.

या कारवाईनंतर गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी गुजरात पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. 'गुजरात पोलिसांचं आणखी एक यशस्वी कामगिरी. नशामुक्तीच्या दिशेनं गुजरात पोलीस काम करत असून, गुजरात पोलिसांनी जवळपास 120 किलो ड्रग्ज जप्त केलं आहे, असं गृहमंत्री संघवी यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरातमधील कच्छमध्ये असलेल्या मुंद्रा पोर्टवर हेरॉईनचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. पोर्टवरून 3000 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. कोट्यवधी रुपये किमतीच्या हेरॉईनची देशभरात चर्चा झाली होती. मुंद्रा पोर्ट अदानी समूहाच्या ताब्यात आहे. त्यावर समुहाकडून खुलासा करण्यात आला होता. गुजरातच्या महसूल गुप्तवार्ता आणि सीमा शुल्क विभागाने ही संयुक्त कारवाई केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in