केरळमध्ये Zika virus चे 14 रूग्ण, केंद्र सरकारने पाठवलं तपासणी पथक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये कोरोनाचे देशाच्या रूग्णसंख्येच्या तुलनेत 53 टक्के रूग्ण आहेत असं सरकारने स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे Zika virus चे 14 रूग्ण केरळमध्ये आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आता या रूग्णांच्या निरीक्षणासाठी एक तपासणी पथकही पाठवलं आहे. केरळच्या तिरूअनंतपुरम जिल्ह्यात झिका व्हायरसचा (Zika Virus) प्रसार होत असल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

याआधी भारतात 2016-17 मध्ये गुजरात राज्यात झिका व्हायरसच्या संसर्गाचे प्रकरण समोर आले होते. आता केंद्र सरकारने केरळमधल्या रूग्णांची स्थिती काय आहे ते पाहण्यासाठी सहा जणांचं एक पथक पाठवलं आहे. हे पथक या झिका व्हायरसचा त्या रूग्णांवर काय परिणाम होतो त्याचं निरीक्षण करणार आहे. द नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीने झिका व्हायरसचे 14 रूग्ण केरळमध्ये आढळल्याची माहिती दिली. या चौदा रूग्णांमध्ये एका 24 वर्षांच्या गरोदर महिलेचाही समावेश आहे.

Zika Virus हा डासांच्या मार्फत पसरतो असं म्हटलं जात असलं तरी काही प्रमाणात त्याचा संसर्ग लैंगिंक संबंधातून होत असल्याचं दिसून आलं आहे. केरळच्या तिरूअनंतपुरममध्ये आढळलेले सगळे रूग्ण हे वैद्यकीय क्षेत्रातले कर्मचारी आहेत. झिका व्हायरसची बाधा झालेली पहिली व्यक्ती ही 24 वर्षीय गरोदर महिला आहे अशीही माहिती वीणा जॉर्ज यांनी दिली. या महिलेला तिरूअनंतपुरमच्या रूग्णालयात 28 जूनला दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी तिला ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ येणं असा त्रास जाणवत होता. या महिलेने बुधवारी म्हणजेच 7 जुलैला एका बाळाला जन्म दिला आहे. महिलेची प्रकृती स्थिर असून तिची प्रसूतीही नैसर्गिक पद्धतीनेच झाली आहे या महिलेने कुठेही प्रवास केल्याचीही नोंद नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे झिका व्हायरस?

झिका व्हायरस हा मच्छरांमार्फत पसरणारा एक व्हायरस आहे. 1947 मध्ये हा व्हायरस युगांडा येथील माकडांमध्ये आढळला होता. त्यानंतर 1952 मध्ये हा व्हायरस माणसांमध्येही आढळून आला. युगांडा आणि टांझानिया येथील लोकांमध्ये हा व्हायरस 1952 मध्ये आढळला होता. त्यानंतर अफ्रिका, अमेरिका, अशिया या खंडांमध्येही याचे रूग्ण आढळून आले होते. नुकतंच म्हणजे 2015 मध्ये ब्राझिलमध्ये या व्हायरसचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. भारतात 2017 मध्ये झिका व्हायरसचा पहिला रूग्ण आढळला होता.

ADVERTISEMENT

झिका व्हायरसची लक्षणं काय?

ADVERTISEMENT

झिका व्हायरसची लक्षणं ही डेंग्यूसारखीच आहेत. ताप येणं, अंगावर पुरळ येणं, स्नायूंमध्ये वेदना होणं झिका व्हायरची लक्षणं आहेत. Aedes species प्रकारच्या डासांमधून या व्हायरसचा संसर्ग होतो.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT