Crime: 15 वर्षीय मुलीवर 'निर्भया'सारखा पाशवी बलात्कार, गुप्तांगातून प्रचंड रक्तस्त्राव; पीडिता ICU मध्ये

15 year old girl brutally raped: 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिला रस्त्याच्या बाजूला फेकून नराधम फरार झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये उघडकीस आली आहे.
15 year old girl brutally raped massive genital bleeding  victims in icu nirbhaya rape case
15 year old girl brutally raped massive genital bleeding victims in icu nirbhaya rape case(प्रातिनिधिक फोटो)

अलवर (राजस्थान): राजस्थानमध्ये (Rajasthan) महिला अत्याचार (Woman atrocities आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ताजं प्रकरण अलवर जिल्ह्यातील आहे, जिथे पुन्हा एकदा क्रौर्याचा किळसवाणा चेहरा समोर आला आहे. अलवरमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (15 Year Minor Girl Gangrape) अत्यंत पाशवी पद्धतीने बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बलात्कारानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला बेशुद्धावस्थेत फेकून दिले आणि तो पळून गेला. सध्या, पीडित अल्पवयीन मुलीला अलवर येथून जयपूर येथील सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. रूग्णालयात पीडिता या क्षणी जीवन-मरणाशी झुंज देत आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात ज्या प्रकारे तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले होते. तसाच काहीसा प्रकार इथेही घडला असल्याचं दिसतं आहे.

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, हे प्रकरण अलवर शहरातील शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, तिजारा पुलावर काल (11 जानेवारी) रात्री एक 15 वर्षीय मूकबधिर अल्पवयीन मुलगी रक्ताच्या थारोळ्यात सापडली होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची ओळख पटवली असून ती अलवर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी 4 वाजेपासून बेपत्ता होती. त्यामुळे तिचे अपहरण करुन नंतर तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.

घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्याचे आढळले असून, तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच गुप्तांगातून जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.

या घटनेची माहिती मिळताच अलवरचे जिल्हाधिकारी नन्नुमल पहाडिया, पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि अनेक उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

अलवरचे जिल्हाधिकारी नन्नूमल पहाडिया यांनी याबाबत सांगितले की, मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांशी बोलल्यानंतर तिला जयपूरला रेफर करण्यात आले आहे. आज मुलीवर शस्त्रक्रिया करता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने अलवर येथून तज्ज्ञांची टीमही पाठवली असून त्यांच्यासोबत अतिरिक्त रक्तही पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर मुलीच्या गुप्तांगाला झालेल्या गंभीर दुखापतीवर वैद्यकीय पथकच नेमकं काय झालं ते सांगू शकेल.

दुसरीकडे, अलवरच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितलं की, मुलीची ओळख पटली आहे, ती दुपारपासून तिच्या गावातून बेपत्ता होती. मामाकडून बेपत्ता झाल्याची माहिती मालाखेडा पोलीस ठाण्यात देण्यात आली.

सध्या पोलीस किंवा कोणताही प्रशासकीय अधिकारी मुलीला झालेल्या गंभीर दुखापतीबाबत स्पष्टपणे काहीही सांगत नाही, मात्र हे हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे.

15 year old girl brutally raped massive genital bleeding  victims in icu nirbhaya rape case
वर्धा: 17 वर्षीय मुलाकडून बलात्कार, 13 वर्षीय मुलगी गरोदर; गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरला अटक

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील गुन्हेगारांचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. मात्र, पोलीस यूपीपासून घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. त्याचवेळी, घटनास्थळापासून या गावापर्यंतचे अंतर सुमारे 20 किलोमीटर आहे.

अशा स्थितीत अलवर शहरातील चौकाचौकात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांवरही पोलिसांची नजर आहे. त्याचवेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या चौकशीत मुलगी मूकबधिर असून तिला बोलता येत नसल्याचे आढळून आले.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षकांनी अनेक पथके तयार केली असून, त्यात अनेक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलिस मुख्यालय अधीक्षक सरिता सिंह, पोलिस उपअधीक्षक हरिराम, अरवली विहार पोलिस ठाण्याचे प्रभारी जहीर अब्बास, शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे प्रभारी रामजीलाल, सदर पोलिस ठाण्याचे प्रभारी राजेश शर्मा आणि अलवर शहर कोतवाल महेश शर्मा उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in