'Antilia प्रकरणाला 150 दिवस उलटले, अजूनही NIA कडून Charge Sheet का दाखल नाही?'

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न
'Antilia प्रकरणाला 150 दिवस उलटले, अजूनही NIA कडून Charge Sheet का दाखल नाही?'

Antilia प्रकरणाला म्हणजेच मुकेश अंबानी यांच्या घरासमोरच्या रस्त्यावर सापडलेल्या स्कॉर्पिओतील स्फोटकांच्या घटनेला 150 दिवस उलटले आहेत. या प्रकरणाचा तपास NIA करतं आहे. तरीही या प्रकरणी अद्याप चार्जशीट म्हणजेच आरोपपत्र का दाखल करण्यात आलेलं नाही? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी आणखीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय आहे सचिन सावंत यांचं ट्विट?

अँटेलिया स्फोटक घटनेचा तपास NIA ने सुरू करून 150 दिवस उलटले आहेत. आरोपपत्र दाखल करण्यासाठी NIA आणखी 30 दिवस देण्यात आले होते. खरंतर केवळ 90 दिवसांची मर्यादा आहे.

1) NIA चार्जशीट दाखल करण्यासाठी सतत वेळ वाढवून का मागते?

2) या प्रकरणातला मास्टरमाईंड कधी पकडणार?

3) NIA स्फोटक भरलेली स्कॉर्पिओ अँटेलियाजवळ ठेवण्याचा खरा हेतू कधी सांगेल? असे तीन प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर यांच्या घराबाहेर 26 फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा येथील खाडीत आढळला आहे. या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनातही गंभीर आरोप केले होते. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ, तिथे असणारी दुसरी कार, मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटला कुणाला भेटले? या प्रकरणाचा तपास सचिन वाझे यांच्याकडेच कसा आला? इतके सगळे योगायोग कसे काय? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारले होते. तसंच या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा NIA कडे देण्यात यावा अशीही मागणी आता फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर हा तपास NIA कडे सोपवण्यात आला.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही NIA कडून केला जातो आहे. आता मात्र काँग्रेसने अँटेलिया स्फोटक प्रकरणी प्रश्न उपस्थित करत अद्याप NIA ने चार्जशीट का दाखल केली नाही? असा प्रश्न विचारला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in