वाशिम : जुन्या घरावर पोलिसांची धाड; सापडला दोन कोटींचा गुटखा, पोलिसही चक्रावले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जका खान, वाशिम

राज्यात अंमली पदार्थविरोधी कारवाया गाजत असतानाच वाशिम पोलिसांनी एका जुन्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल दोन कोटींचा गुटखा सापडला आहे. बंदी असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाई गुटख्याच्या साडा सापडला.

वाशिम जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना कळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांना स्वतःच्या नेतृत्वात अचानक रिसोड शहरात धाड टाकली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सावत्र बापाचा आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अपहरण झाल्याची खोटी तक्रारही दाखल

शहरातील धोबी गल्लीत असलेल्या एका जुन्या घराची झाडाझडती घेतली. पोलिसांनी घराला लावलेलं कुलूप तोडलं. घरात पोहोचल्यानंतर गुटख्याचा साठा पाहून पोलीस अधीक्षकांसह पथकातील पोलीसही अवाक् झाले. घरातील तीन खोल्यांमध्ये बंदी असलेल्या गुटख्याचा साठा आढळून आला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी घराच्या मालकासह दोन जणांना अटक केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा कोठून आला? गुटख्याचा पुरवठा कुणी केला? याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

‘ती’ निघाली ‘तो’: मुलीच्या नावे इन्स्टा अकाऊंट; लेस्बियन दाखवून मुलींचे मागवायचा नग्न फोटो

वाशिम जिल्ह्यात गुटख्याचा साठा आढळल्याची ही पहिलीच घटना नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होते. या आधीही पोलिसांनी अनेक धाडी टाकत कारवाया केल्या आहेत. काही वर्षापूर्वी जिल्ह्यातील गुटख्याचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांनी 1 कोटींपेक्षा जास्त गुटखा जप्त केला होता. आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT