2 लाखांहून थेट 0, Squid Game नावाच्या या Cryptocurrency ने लोकांना केलं कंगाल

Collapses Cryptocurrency: Squid Game नावाच्या या Cryptocurrency ने अनेक गुंतवणूकदारांना देशोधडीला लावलं आहे. जाणून घ्या काय आहे हा नेमका स्कॅम.
2 लाखांहून थेट 0, Squid Game नावाच्या या Cryptocurrency ने लोकांना केलं कंगाल
2 lakhs straight to 0 squid game crypto token collapses cryptocurrency Squid Game series netflixSquid Game Still: Netflix

आजकाल क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे हा एक नवा ट्रेंड बनला आहे. जे गुंतवणूक करत आहेत आणि जे क्रिप्टो टोकन तयार करत आहेत त्या दोघांनाही सामान्यतः फायदा होत असल्याचं दिसत आहे. पण आता याच क्रिप्टोकरन्सीबाबत रोज नवनवीन घोटाळेही समोर येत आहेत. स्क्विड गेम नावाचा क्रिप्टो याचं एक मोठं उदाहरण आहे.

स्क्विड गेम सीरीज (Squid Game)सध्या खूप लोकप्रिय होत आहे. ती सीरिज इतकी लोकप्रिय झाली आहे की त्याच्या नावाने क्रिप्टो टोकन बनवण्यात आलं. ही क्रिप्टोकरन्सी लोकांनी प्रचंड प्रमाणात विकत घेतली. पण ज्यांनी ही क्रिप्टोकरन्सी खरेदी केली ते आता अक्षरश: कंगाल झाले आहेत. पण नेमकं असं का घडलं?

खरं तर, Netflix ची सीरीज Squid Game या मालिकेचे यश पाहून त्याच नावाने एक क्रिप्टोकरन्सी तयार करण्यात आली होती. जी आता क्रॅश झाली आहे आणि तिचे मूल्य थेट 0 झाले आहे.

कॉइन मार्केट कॅपनुसार, स्क्विड गेम नावाच्या क्रिप्टोकरन्सीची किंमत अलीकडे सुमारे 2 लाख रुपये होती, जी आता 0 झाली आहे. या क्रिप्टो टोकनची वेबसाइटही गायब झाली आहे.

टेक वेबसाइट गिज्मोडोने हा एक मोठा घोटाळा असल्याचे सांगितले होते. परंतु असे असूनही गुंतवणूकदारांनी स्क्विड गेम क्रिप्टोमध्ये गुंतवणूक सुरूच ठेवली. अनेकांनी ही क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होते. हे क्रिप्टो टोकन प्री-सेल दरम्यान प्रचंड स्वस्तात विकले गेले होते ज्यानंतर त्याचे मूल्य वेगाने वाढले होते.

(फोटो सौजन्य: Getty)

गिज्मोडोने त्याला रॅग पुल ही टर्म दिली होती. Rug Pull म्हणजे या क्रिप्टोकरन्सीच्या निर्मात्यांनी सर्व नाणी विकून खरा पैसा कमावला. ज्यामुळे आता त्या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य शून्य झाले आहे.

कॉइन मार्केट कॅपनुसार, Rug Pull च्या आधी Squid Game क्रिप्टोची मार्केट कॅप सुमारे 14.5 कोटींपर्यंत पोहचली होती. कॉइन मार्केटकॅपने गुंतवणूकदारांना इशारा देखील दिला होता की Squid Game नावाचा हा टोकन स्कॅम देखील असू शकतो. मात्र अनेक गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.

20 ऑक्टोबरला SQUID Crypto लाँच करण्यात आलं होतं. सुरुवातीला ते स्वस्त होते, पण नंतर ते खूप महाग झाले. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी यात गुंतवणूक केली होती त्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

आता अशी परिस्थिती आहे की ज्यांनी हे क्रिप्टो अत्यंत स्वस्तात विकत घेतले होते ते देखील तोट्यात आहेत. कारण या क्रिप्टोचे आता जे मूल्य आहे ते यापूर्वी कधीही नव्हते. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचे मूल्य घसरले आहे.

हा क्रिप्टो एक प्रकारचा मोठा स्कॅम ठरला आहे. कारण त्याचे डोमेन SquidGame.cash लॉन्च होण्यापूर्वीच नोंदणीकृत झाले होते. एवढेच नाही तर या क्रिप्टोचा Squid Game सीरीजशी काहीही संबंध नाही, कारण या सीरीजच्या निर्मात्यांनी किंवा नेटफ्लिक्सने याला दुजोरा दिलेला नाही.

2 lakhs straight to 0 squid game crypto token collapses cryptocurrency  Squid Game series netflix
Google Play Store वरुन हटवले 8 खतरनाक Apps

Squid Game नावाची ही क्रिप्टोकरन्सी कोणत्याही प्रकारे अधिकृत सीरीजशी संबंधित नाही. हे क्रिप्टो टोकन स्क्विड गेमपासून प्रेरित आहे आणि लॉन्च झाल्यापासून त्याचे मूल्य २३ लाख टक्क्यांनी वाढले होता. पण आता एक प्रकारे ही क्रिप्टोकरन्सी क्रॅश झाली आहे आणि याचे मूल्य शून्य डॉलरवर पोहोचले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in