खोपोली : धबधब्यावर भिजणं जिवावर बेतलं, २ महिलांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठवाड्यासह राज्यभरात आज पावसाने चांगलीच बॅटींग केली. रायगड जिल्ह्यातील खोपोली भागात झेनिथ धबधब्यावर पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी तीन जणं वाहून गेले आहेत. यातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून ८ वर्षांचा एक मुलगा बेपत्ता असल्याचं कळतंय. या चिमुरड्याला शोधण्याची मोहीम अजुनही सुरु असल्याचं कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात कर्जत खालापुरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. खोपोलीतील झेनिथ धबधबा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असून रोज येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. खोपोलीतील काही पर्यटक इथं फिरण्यासाठी आले होते.

झेनिथ धबधब्याच्या प्रवाहापासून निघाणाऱ्या नदीला आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. काही पर्यटक नदीचा प्रवाह ओलांडताना वाहुन गेले तर काही जण प्रवाहामध्ये अडकले होते. ही घटना कळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक कार्यकर्तेही मदतीला पोहोचले. एकूण तीन पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे, तर इतर पर्यटकांना रेस्क्यु करण्यात यश आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यामध्ये मेहरबानू खान (40 वर्षे) रुबिना वेळेकर ( 40) या महिला वाहून गेल्या आहे. तर आलम खान हा 8 वर्षांचा मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. हे सर्व जण खोपोली परिसरात राहणारे आहे. यावेळी अडकलेल्या १२ जणांशा रेस्क्यू करण्यात यश आले असून बेपत्ता चिमुरड्याची शोध मोहीम सुरु आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT